घटनेची जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा; मनसेची मागणी

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात आग लागून रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेची जबाबदारी स्विकारून झोपलेल्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी केली.

    अहमदनगर : अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेची जबाबदारी स्विकारून झोपलेल्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी केली.

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला भीषण आग लागली. त्यावरून मनसेने पालकमंत्री मुश्रीफ यांना टीकेचे लक्ष्य केले. मागील काळात राज्यात अशाच प्रकारच्या घटना घडत होत्या. त्या वेळेस संपूर्ण हॉस्पिटलची राज्यातील फायर ऑडिट करुन घेण्याचे आदेश आरोग्यमंत्री यांनी दिले होते. तरी सुद्धा अहमदनगरची शासकीय अधिकारी, गहाळ राहिले या सिव्हील हॉस्पिटलचे फायर ऑडिट झालेले आहे का नाही? झाले असेल तर दर सहा महिन्याला फायर यंत्र सुरळीत चालतात का नाही? याची खात्री करून घेतली गेली पाहिजे होती.

    इलेक्ट्रिक यंत्रणा सुरळीत आहे का नाही? त्याचे ऑडिट सुध्दा वारंवार करणे गरजेचे होते. परंतु, असे काही झालेले दिसत नाही. मागच्या दोन दिवसांपूर्वीच सिव्हील सर्जन यांच्या गाडीला हॉस्पिटलच्या आवारात पार्किंगमध्ये आग लागली होती. इतके झाले तरी बारीक लक्ष ठेवत काळजी घेणे गरजेचे होते. परंतु असे काही झाले नाही दोन दिवसानंतर आज सिव्हील हॉस्पिटलच्या आयसीयू विभागाला आग लागून रुग्णांचा मृत्यु झाला आहे तर वीस जण गंभीर जखमी आहेत.

    या सर्व प्रकाराला दोन दिवसांपूर्वी याच हॉस्पिटलच्या आवारात पार्कींगमध्ये गाडीला आग लागून सुध्दा व्यवस्थित चौकशी केली गेली नसल्यामुळे सिव्हील सर्जन डॉ. पोखरणांच्या हलगर्जपणामुळे हा प्रकार झाला असुन त्यास सर्वस्वी सिव्हील सर्जन डॉक्टर पोखरणा हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक या पदावरून बडतर्फ करावे. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेच्या नितीन भुतारे यांनी गृहमंत्री तसेच आरोग्यमंत्री यांना मेलद्वारे निवेदन पाठवून केली.

    तसेच झोपलेल्या पालकमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही भुतारे यांनी केली.