या असल्या माणसाला बाप म्हणायचं? आई गावी गेली असताना पित्याने 11 वर्षाच्या मुलीसह असं काही केले की… तपास करणारे पोलिसही चक्रावले

    अहमदनगर : जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे.  बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी अशी संतापजनक घटना आहे. आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.

    आरोपीची पत्नी काही कारणास्तव बाहेरगावी गेली होती. यावेळी आरोपी आपल्या  11 वर्षीच्या मुलीसह एकटाच होता. घरात कुणी नसल्याची संधी साधत या नराधम पित्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलगी झोपेत असतानाच पित्याने तिच्यासोबत गैरप्रकार केला. आई गावावरुन घरी आल्यानंतर पीडितीने आईला हा सर्व प्रकार सांगितला.

    या आईनंतर आईने मुलाला घेवून थेट पोलिस ठाणे गाठले. आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. पित्याने केलेला हा गैरप्रकार पाहून पोलिसही हादरले.