साकूरमध्ये दोघा चोरट्यांना रंगेहाथ पकडत दिला चोप! ; घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल

घारगाव पोलिसांना समजताच प्रभारी पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत, पोलिस हेडकॉन्स्टेबल दशरथ वायाळ यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता उस्वाल इम्पीरियल चव्हाण (रा.वाळुंज पारगाव, ता.नगर), जीरिप भगवान भोसले (रा.अरणगाव रोड, नगर) अशी या दोघांनी नावे सांगितली असून तिसरा पळून गेला आहे. याप्रकरणी ठकाजी खेमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील तिघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक ६१/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दशरथ वायाळ हे करत आहे.

    संगमनेर :संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील साकूर येथील सेंट्रल बँकेत एका ग्राहकाच्या खिशातून पंधरा हजार रुपये काढणार्‍या तिघा चोरट्यांपैकी दोघांना नागरिकांनी रंगेहाथ पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. ही घटना बुधवारी (ता.२४) दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे.

    याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, साकूर जवळील चिंचेवाडी येथील ठकाजी रामभाऊ खेमनर हे शेतकरी आपले वडील रामभाऊ खेमनर यांना बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पैसे काढण्यासाठी साकूरच्या सेंट्रल बँकेत घेवून आले होते. त्यावेळी ठकाजी खेमनर हे पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांचे वडील बाजूला बसले होते. त्याचवेळी पाळत ठेवून असलेल्या तिघांनी त्यांच्या खिशातील पंधरा हजार रुपये अलगदपणे काढून घेतले. परंतु ही गोष्ट रामभाऊ खेमनर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तिघांना पाहिले आणि काही नागरिकांच्या मदतीने जिल्हा बँकेच्या शाखेत रंगेहाथ पकडत चांगलाच चोप दिला. मात्र यातील एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

    या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना समजताच प्रभारी पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत, पोलिस हेडकॉन्स्टेबल दशरथ वायाळ यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता उस्वाल इम्पीरियल चव्हाण (रा.वाळुंज पारगाव, ता.नगर), जीरिप भगवान भोसले (रा.अरणगाव रोड, नगर) अशी या दोघांनी नावे सांगितली असून तिसरा पळून गेला आहे. याप्रकरणी ठकाजी खेमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील तिघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक ६१/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दशरथ वायाळ हे करत आहे.