परतफेड केलेल्या पीक कर्जाचे व्याज शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा; अमोल राळेभात यांच्या पाठपुराव्याला यश

सन २०१९-२०२० मध्ये शेतकऱ्यांनी परतफेड केलेल्या पीक कर्जाचे व्याज शासनाकडून देण्यास विलंब होत होता. याबाबत बरेच दिवस झाल्यामुळे व्याज मिळते कि नाही अशी भीती शेतकरी बांधवामध्ये निर्माण झाली होती. याबाबत अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी मागील २ महिन्यांपूर्वी व्याज परतावा मिळणेबाबत शासन स्तरावर पाठपुरावा केला.

    जामखेड : सन २०१९-२०२० मध्ये शेतकऱ्यांनी परतफेड केलेल्या पीक कर्जाचे व्याज शासनाकडून देण्यास विलंब होत होता. याबाबत बरेच दिवस झाल्यामुळे व्याज मिळते कि नाही अशी भीती शेतकरी बांधवामध्ये निर्माण झाली होती. याबाबत अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी मागील २ महिन्यांपूर्वी व्याज परतावा मिळणेबाबत शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून सन २०१९-२०२० मधील ज्या सभासदांनी घेतलेल्या पीक कर्जाची सव्याज परतफेड केलेली आहे. अशा सभासदांचे राज्य व केंद्र शासनाचे व्याज बचत खात्यावर जमा करण्यात आलेले आहे.
    याबाबत जामखेड तालुक्यासाठी सन २०१९-२०२० मधील दि. ३१/०८/२०२० अखेर परतफेड केलेल्या ७६४८ सभासदांचे १ कोटी २० लाख ६२ हजार ८८० रुपये व्याज राज्य शासनाकडून प्राप्त झाले असून दि. ३१/०३/२०२० अखेर परतफेड केलेल्या २७०९ सभासदांचे ३७ लाख ६४ हजार १९९ रुपये केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले आहेत. यामुळे शेतकऱ्याची मकर संक्राती तिळगुळाप्रमाणे गोड झाली आहे.
    त्याचप्रमाणे महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मधील जामखेड तालुक्यातील कर्जमुक्ती लाभापासून वंचित ४९ सभासदांची २२ लाख १६ हजार १८२ रुपये कर्जमाफीची रक्कम संचालक अमोलजी राळेभात साहेब यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जखाती जमा झालेली आहे.
    तसेच माहे एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२० या काळामध्ये ज्या शेतकरी सभासदांनी पीक कर्जाची परतफेड केलेली आहे, त्यांचेही केद्र शासनाचे व्याज त्यांच्या बचत खाती लवकरात लवकर जमा होणेसाठी पाठपुरावा केला जाईल,अशी ग्वाही अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे युवा संचालक अमोल राळेभात यांनी दिली.