महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरावर रोपवे व्हावा ; माजी आ. वैभव पिचड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पर्यटनांच्या हेतुने महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून टेंन्ट, चहा नास्ता टपऱ्या, कॅमेरे हे दिल्यामुळे येथील तरुणांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. कळसुबाई शिखरावर अनेक ट्रेकर्स जाण्यासाठी पहाटे ५ वाजता सुरुवात करीत असतात. कळसुबाई शिखरावर स्ट्रीट लाईट नेण्याचेही काम केलेले असून त्याचा उपयोग रात्रीचा होत असतो.

    अकोले: तालुक्यातील महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरावर रोपवे व्हावा,यासाठी यापूर्वी दिलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी व्हावी,अशी मागणी माजी आ.वैभवराव पिचड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून केली आहे. पिचड यांनी निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर कळसुबाई असून सर्वात उंच शिखर म्हणून या शिखराची ओळख आहे. कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी नित्य नियमांची वाटचाल तालुक्यातील बारी गावापासून सुरुवात होत असते. कळसुबाई शिखाराची संपूर्ण हद्द बारी ग्रामपंचायतच्या हद्दीत आहे.

    येथे येणारे पर्यटक व भाविक यामुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. अकोले तालुका हा आदिवासी, दुर्गम व डोंगराळ असून या तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण मोठया प्रमाणात असते. तालुक्यामधील भातशेती हे प्रमुख पिक असून याच पिकावर वर्षभर शेतकऱ्यांना अवलंबून रहावे लागत असते. यामुळे पर्यटनांच्या हेतुने महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून टेंन्ट, चहा नास्ता टपऱ्या, कॅमेरे हे दिल्यामुळे येथील तरुणांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. कळसुबाई शिखरावर अनेक ट्रेकर्स जाण्यासाठी पहाटे ५ वाजता सुरुवात करीत असतात. कळसुबाई शिखरावर स्ट्रीट लाईट नेण्याचेही काम केलेले असून त्याचा उपयोग रात्रीचा होत असतो.

    यापूर्वी तत्कालीन पर्यटन मंत्री छगनजी भुजबळ यांच्या कालखंडात कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी रोपवे व्हावे म्हणून प्रस्ताव सादर केलेला होता. त्या प्रस्तावानुसार अकोले तालुक्यात प्रस्तावित सन २०१३-१४ साली सर्वात पहिला प्रस्ताव दिलेला होता. यामुळे आपल्या स्तरावरुन योग्य ते प्रयत्न व्हावेत अशी मागणी पिचड यांनी केली आहे.