२०२१ हे सर्वांना आरोग्यदायी जावून प्रत्येकाची संकल्पपूर्ती होवो ; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या शुभेच्छा 

संगमनेर : मागील वर्षी कोरोना संकटाने माणुसकी बरोबर आरोग्याचे महत्व अधोरेखीत केले. नवीन २०२१ वर्षामध्ये राज्य, देश व जग कोरोनामुक्त होवून प्रत्येकाला चांगले आरोग्य लाभून प्रत्येकाची संकल्पपूर्ती यशस्वी होवो. अशा शुभेच्छा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहे. 

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतांना ते म्हणाले कि, भूतकाळ हा भविष्यकाळाचा मार्गदर्शक असतो. मागील वाईट आठवणी सोडून प्रत्येकाने सकारात्मक विचार जोपासत काम करावे. मानवता व बंधूता हीच मोठी ताकद असून ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे. आरोग्याचे महत्व अनन्य साधारण असून प्रत्येकाने स्वःतची काळजी घ्या. कोरोनाचे नियम पाळा.यावर्षी पुन्हा पूर्वी प्रमाणे सर्व सुरळीत होणेसाठी काळजी घ्या. तसेच नववर्षात प्रत्येकाने एक चांगला संकल्प करुन सामाजिक बांधिलकी ठेवत राष्ट्रहितासाठी योगदान द्यावे. २०२१ हे वर्ष सर्वांना सुखदायी व आनंददायी जावो असे ही ते म्हणाले, आ.डॉ सुधीर तांबे म्हणाले की  २०२० मधील महामारीनंतर २०२१ हे नवीन आशादायी ठरणार आहे. थांबलेले जनजीवन पुन्हा पुर्ववत होवून प्रत्येकास आरोग्य,समृध्दी लाभावी. तसेच प्रत्येकाच्या हातून पर्यावरण रक्षण,स्वच्छता या बरोबर राष्ट्रहितासाठी काम व्हावे. त्यासाठी चांगला संकल्प करुन तो सिध्दीश नेऊन प्रत्यकाची संकल्पपूर्ती व्हावी अशा शुभेच्छा नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी दिल्या.