खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले, ‘स्व. दिलीप गांधीमुळेच मी खासदार’

नगरमध्ये उद्याेजकता निर्माण करण्यासाठी, नवीन पिढीला उद्याेग धंद्यांची जोड देण्यासाठी स्व. दिलीप गांधी यांनी केलेले काम सुवेंद्र गांधी यापेक्षा अधिक पुढे नेतील, असा मला विश्वास आहे.

    अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : स्व. दिलीप गांधी यांनी मदत केली नसती तर मी खासदार झालो नसतो, ही वास्तविकता नाकारता येणार नाही. ज्या पद्धतीने गांधी कुटुंबीय माझ्या मागे उभे राहिले. त्याचप्रमाणे विखे कुटुंब गांधी परिवारामागे उभे राहील, अशी ग्वाही खासदार डॉ. सुजय विखे (Dr. Sujay Vikhe) यांनी दिली.

    नगरमध्ये उद्याेजकता निर्माण करण्यासाठी, नवीन पिढीला उद्याेग धंद्यांची जोड देण्यासाठी स्व. दिलीप गांधी यांनी केलेले काम सुवेंद्र गांधी यापेक्षा अधिक पुढे नेतील, असा मला विश्वास आहे. गांधी परिवाराच्या वतीने दिवाळी निमित्त फराळ व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी सरोज गांधी, सुवेंद्र गांधी उपस्थित होते.

    मिसेस गांधींचे डोळे पाणावले

    सहकर पॅनेलचे सर्वच्या सर्व १७ उमेदवार निवडून आणा हीच स्व. दिलीप गांधी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक आवाहन करताना सरोज गांधी यांचे डोळे पाणावले. सुवेंद्र गांधी म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी आमच्यावर केले आहेत. मात्र, न्याय देवतेने आम्हाला सशर्त जामीन मंजूर करत न्याय दिला आहे. कायम सत्याचाच विजय होत असतो. बँकेच्या कमी झालेल्या ठेवी पुन्हा वाढण्यास सुरवात झाली आहे.