
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील स्थानिक ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा करणाऱ्या मोटर लाईट बील ग्रामपंचायतीने वेळोवेळी वीज बिल न भरल्यामुळे साकुर उपकेंद्र महावितरणने वीज कनेक्शन कट करत ग्रामपंचायतीला मोठा धक्का दिला आहे.
अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील स्थानिक ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा करणाऱ्या मोटर लाईट बील ग्रामपंचायतीने वेळोवेळी वीज बिल न भरल्यामुळे साकुर उपकेंद्र महावितरणने वीज कनेक्शन कट करत ग्रामपंचायतीला मोठा धक्का दिला आहे. परिणामी ग्रामपंचायत हद्दीत होणाऱ्या पाणीपुरवठा व त्याचे परिणाम झाल्यामुळे स्थानिक राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये नाराजीचा सूर बघायला मिळत आहे.
मांडवा बुद्रुक ग्रामपंचायत, जांबुत ग्रामपंचायत, कवठेमलकापूर ग्रामपंचायत अशा प्रतिष्ठित ग्रामपंचायतीने वेळी पाणीपुरवठा करणाऱ्या मोटार लाईट बील न भरल्यामुळे महावितरण लाईट कट करत ग्रामपंचायतीला फार मोठा शॉक दिला आहे.
दरम्यान साकुर उपकेंद्राचे महावितरण उपअभियंता घुगे साहेब यांनी सांगितले की वेळोवेळी नोटिसा पाठवून देखील ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे शेवटी वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई केली आहे.