तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर मनपाची आरोग्य यंत्रणा सज्ज; ‘नो वॅक्सिन नो एन्ट्री’

मनपा आरोग्य विभाग व आरोग समितीची कोरोना संदर्भात उपाययोजनांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 8 दिवसांपासून नगर शहरामध्ये सातत्याने कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज अखेर शहरांमध्ये 256 ॲक्टिव्ह रुग्ण आहे. यासाठी रुग्णसंख्या वाढू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

    नगर : मनपा आरोग्य विभाग व आरोग समितीची कोरोना संदर्भात उपाययोजनांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 8 दिवसांपासून नगर शहरामध्ये सातत्याने कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज अखेर शहरांमध्ये 256 ॲक्टिव्ह रुग्ण आहे. यासाठी रुग्णसंख्या वाढू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

    कोरोनाचा संसर्ग विषयांवर मात करायची असेल तर लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. 178 कोरोना रुग्णांमध्ये 52 रुग्णांचे लसीकरण झालेले नाही. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. याचबरोबर लसीकरण न घेतलेल्यानां धोका मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने लसीकरणाची मोहीम जोरात सुरू करण्यात आली आहे. लस न घेणाऱ्यांवर कारवाई करून ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’ प्रवेशबंदी करावी. शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ न देता कडक निर्बंध लावावे, अशी मागणी आरोग्य समितीच्या वतीने आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे करण्यात येणार आहे.

    मनपा आरोग्य समितीच्या वतीने कोरोना रुग्णवाढ उपाययोजना संदर्भात संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, संजय ढोणे, सतीश शिंदे, सचिन जाधव, निखिल वारे, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, शशिकांत नजान व आरोग्य केंद्रातील डॉक्टर उपस्थित होते.