सिव्हिल हॉस्पिटलच्या वॉल कंपाऊंडसाठी सव्वा कोटी

    अहमदनगर : सिव्हिल हॉस्पिटलभोवती ७३० मीटर लांबी व साडे नऊ फूट उंची असलेले वॉल कंपाऊंड उभे राहणार आहे. त्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्याचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण परिसराची योग्य निगा राहावी, सार्वजनिक रस्त्यासारखा अनावश्यक होणारा वापर टळावा, रुग्णांना शांतता व चांगली सेवा मिळावी.

    गुरं-ढोरांचा सतत होणारा वावर कमी व्हावा. एकच गेट राहणार असल्याने नियंत्रण चांगले राहावे यासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीच्या कामाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ आज विधिवत पूजा करून, नारळ वाढवून व कुदळ मारून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. या संरक्षक भीतीच्या उभारणीसाठी सुमारे एक कोटी २५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. याप्रसंगी सिव्हिल सर्जन डॉ. सुनील पोखरणा, वैधकीय अधिकारी डॉ. मनोज घुगे, मुद्रिक एन्टरप्रायजेसचे संचालक दयानंद कवाळे, पीडब्लूडीचे इंजिनिअर भागवत, नोडल अधिकरी बापूसाहेब कांडेकर यावेळी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. सिव्हिल सर्जन डॉ. सुनील पोखरणा बोलताना म्हणाले कि जिल्हा रुग्णालयाच्या भोवती उभारण्यात येणारी ही संरक्षक भिंत ही ७३० मीटर लांब आणि साडे नऊ फूट उंच असणार आहे. या भिंतीसाठी अंदाजे सव्वा कोटी रुपयांचा खर्च येईल. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांच्या वस्तीगृहाजवळ एक गेट ही बांधण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट ची ही यावेळी पाहणी केली. अपेक्षित तिसऱ्या कोविड लाटेची गंभीरता पाहता ऑक्सिजन प्लॅन्टचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे जेणे करून येणाऱ्या रुग्णांना याचा फायदा होईल असे सांगून काही सूचना देखील केल्या.