स्वच्छ सर्व्हेक्षणाचे तीन तेरा पालिकेच्या अधिकाऱ्यांनीच गायब केले शाैचालयातील साहित्य

शाैचालयास अधिक मानांकन असल्याने त्यावर अधिक भर पािलकेकडून दिला जात आहे. शुक्रवारी केंद्राचे पथक तपासणीसाठी आले असता पािलकेने शहरातील शाैचालय नवीन वास्तूसारखे सुशोभीत केले. यात आरसे, महिलांसाठी सॅनेटरी नॅपकीनचे मशीन, डस्टबीन, पाण्यासाठी बादल्या, सँटेटायझरचा ड्रम, हात धुण्यासाठी साबण व डेटाॅल हे सािहत्य ठेवले. दरवाजासमोर देशी-विदेशी झाडांच्या कुंड्या ठेवण्यात येऊन पथकासोबत या सर्व वस्तूंचे फाेटाेसेशन केले.

    शिर्डी : राहाता पालिकेचा गोलमाल भारत स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानाचे हजारो रूपयांचे साहित्य सुलभ शाैचालयातून पालिकेच्याच अधिकाऱ्यांनी काही मिनीटात गायब झाल्याची याची चौकशी करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.

    राहाता शहरात गेल्या महिनाभरापासून भारत स्वच्छ अभियानाची जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील मुख्य रस्ता, पािलका इमारत तसेच शहरातील सर्व शाैचालये रंगेबेरंगी चित्र व सूचनांनी सजवण्यात आली. लाखो रूपये या अभियानावर खर्च केला जात असून हा केवळ देखावा पािलका प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप निधाणे यांनी केला आहे. केवळ फाेटाेसेशन करून हे स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान कागदावरच दाखविले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्र व राज्य पातळीवरील पथक पाहणी करण्यापुरते हे दाखविले जात असून ही जनतेच्या व सरकारच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे.

    या अभियानांतर्गत शाैचालयास अधिक मानांकन असल्याने त्यावर अधिक भर पािलकेकडून दिला जात आहे. शुक्रवारी केंद्राचे पथक तपासणीसाठी आले असता पािलकेने शहरातील शाैचालय नवीन वास्तूसारखे सुशोभीत केले. यात आरसे, महिलांसाठी सॅनेटरी नॅपकीनचे मशीन, डस्टबीन, पाण्यासाठी बादल्या, सँटेटायझरचा ड्रम, हात धुण्यासाठी साबण व डेटाॅल हे सािहत्य ठेवले. दरवाजासमोर देशी-विदेशी झाडांच्या कुंड्या ठेवण्यात येऊन पथकासोबत या सर्व वस्तूंचे फाेटाेसेशन केले. या कालावधीत काेणालाही शाैचालयाच्या वापरास परवानगी दिली नाही. पथक बाहेर पडताच हे सर्व साहित्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने सोबत घेऊन दुसऱ्या शाैचालयात नेवून सजविले. तर जंगल प्रभागात नवीन डस्टबीन महिलांच्या हातात देऊन त्यांचे फोटो काढून डस्टबीन परत घेऊन आले. हे फोटो व व्हीिडओ काढून साेशल मिडीयावर टाकले. काही नगरसेवकांनी घटनास्थळी येऊन पालिकेचा सुरू असलेला हा धुळफेकीचा प्रकार पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या सर्व प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी शहानिशा करून कठाेर कारवाईची मागणी निधाणे यांनी केली.