मोठी बातमी! शिर्डीत नववर्षाच्या स्वागताला पालखी आणू नका ; ओमायक्रॉनचा धोका पहाता संस्थानने घेतला निर्णय

नवीन वर्षाच्या सुरुवातीला (New Year) विविध राज्यभरातून पालख्या शिर्डीत (Shirdi) येत असतात. त्यांना प्रवेश हा दर्शनासाठी (Darshan) दिला जात असतो. मात्र या वर्षी ऑनलाइन दर्शनाची सक्ती असल्याने ऑनलाइन पास घेतल्यानंतरच दर्शनाची सोय उपलब्ध होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत पालख्या घेऊन येऊ नये, येथे आल्यास त्यांची राहण्याची करता येणार नाही असं संस्थानच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

    अहमदनगर, शिर्डी : कोरोनाचं (Corona Virus) संकट अद्यापही कमी झालेलं नाही. त्यातच ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटने (Omicron) आणखी चिंता वाढविली आहे. अशातच, लोकं सर्व नियम (Not Follow The Rules) पायदळी तुडवताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवरच नव्या वर्षाची सुरूवात म्हणून शिर्डीत पालखी (No Entry For Palkhi Saibaba Darshan) आणू नका असा निर्णय शिर्डी संस्थानने घेतला आहे. ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव पाहता लोकांनी गर्दी करू नये हाच यामागचा संस्थानचा हेतू आहे.

    नवीन वर्षाच्या सुरुवातीला विविध राज्यभरातून पालख्या शिर्डीत येत असतात. त्यांना प्रवेश हा दर्शनासाठी दिला जात असतो. मात्र या वर्षी ऑनलाइन दर्शनाची सक्ती असल्याने ऑनलाइन पास घेतल्यानंतरच दर्शनाची सोय उपलब्ध होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत पालख्या घेऊन येऊ नये, येथे आल्यास त्यांची राहण्याची करता येणार नाही असं संस्थानच्या वतीने सांगण्यात आलं आहे. २५ डिसेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ दरम्यान विशेष नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाइन दर्शनाचा पास कन्फर्म झाल्याशिवाय प्रवासाचा विचार करू नये अशी ताकीदही देण्यात आली आहे. ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही कठोर नियमावली तयार करण्यात आली असल्याचं मंदिर प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.