साई संस्थानच्या अध्यक्षांचे मंदिर पहाणी करतानाचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज व्हायरल ; सहा जणांना अटक

गेल्या ३१ जुलै रोजी साईसंस्थान व्यवस्थापनाच्या बैठकीनंतर जिल्हा प्रधान न्यायाधीश व तदर्थ समितीच्या सदस्या असलेल्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर मंदिराची पहाणी केली होती. एका युट्युब चॅनलने मात्र अध्यक्ष व समितीच्या सदस्यांनी कोविड नियमांचा भंग केल्याची व मंदिर बंद असतांनाही दर्शन कसे घेतले अशी बातमी प्रसिद्ध केली होती.

    शिर्डी : साईबाबा संस्थानचे अध्यक्ष असलेले जिल्हा मुख्य न्यायाधीश यांचे साईमंदिर पहाणी करत असतांनाचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमावर व्हायरल करत अध्यक्ष आणि तदर्थ समीतीच्या सदस्यांची बदनामी केल्या प्रकरणी साईसंस्थानच्या प्रशासकीय अधिकार्यासह सहा जणांना पोलीसांनी अटक केली आहे .

    गेल्या ३१ जुलै रोजी साईसंस्थान व्यवस्थापनाच्या बैठकीनंतर जिल्हा प्रधान न्यायाधीश व तदर्थ समितीच्या सदस्या असलेल्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर मंदिराची पहाणी केली होती. एका युट्युब चॅनलने मात्र अध्यक्ष व समितीच्या सदस्यांनी कोविड नियमांचा भंग केल्याची व मंदिर बंद असतांनाही दर्शन कसे घेतले अशी बातमी प्रसिद्ध केली होती. यात मंदिरातील फोटो व सीसीटिव्ही फुटेजही वापरण्यात आले होते़. यामुळे भााविकांमध्ये गैरसमज पसरला व बदनामी झाल्या प्रकरणी अध्यक्षांनी संस्थानच्या सुरक्षा प्रमुखांना चौकशीचे आदेश दिले होते़.

    संबधितांनी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्याच्या हेतूने हे कृत्य केले असून, यामुळे मंदिर सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला, हे सर्व करत असतांना हार्डडिक्स मधील फोटो डिलीट करण्यात आले व संगणकातील फुटेज घेवून त्यात छेडछाड केल्याच्या गंभीर मुद्द्यावर काल सायंकाळी साईमंदिर सुरक्षा प्रमुख हर्षवर्धन गवळी यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीसांनी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभाग प्रमुख विनोद कोते, राहुल फुंदे, संस्थान कर्मचारी पतपेढीचे कर्मचारी अजित जगताप, सचिन गव्हाणे व कर्मचारी चेतक साबळे यांच्या विरोधात आयपीसी ५०१, ४०८, ४६५, ४६९ व ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० व शासकीय गुपीते अधिनियम १९२३ नुसार गुन्हे दाखल केले आहेत़ या सर्वांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून पोलीस उपअधिक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस पुढील तपास करत आहेत़.