वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रताप कळसे यांचे यश; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

न्यु आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथे झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत मंडळाधिकारी प्रताप कळसे हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत.

    नगर तालुका : न्यु आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथे झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत मंडळाधिकारी प्रताप कळसे हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत.

    न्यु आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज जिमखाना विभाग व मास्टर वेटलिफ्टिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने वेटलिफ्टिंगच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन मास्टर गेम्स महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुनील जाधव, संस्थेचे सहसचिव विश्वासराव आठरे यांच्या हस्ते करण्यात आले.

    या स्पर्धेत ८१ किलो वजन गटात खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेत मंडळाधिकारी प्रताप कळसे हे प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. त्यांची तिरुअनंतपुरम (केरळ) येथे दि.१८ ते २४ मे दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

    त्यांच्या या निवडीबद्दल तहसीलदार उमेश पाटील, मंडळाधिकारी वृषाली करोसिया, महसूल विभाग नगर तालुका, डोंगरगणचे माजी सरपंच कैलास पटारे, सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ काळे, राम पटारे, राजू पवार, शरद मगर, रमेश बाबर यांच्यासह सर्वत्र कौतुक होत आहे.