अन्…आता मेंढ्याच्या वाघुरीत विजेचा प्रकाश ; बिबट्या पासून बचाव होण्यासाठी मेंढपाळांची शक्कल

संगमनेर तालुक्यासह पठारभागात यावर्षी बिबट्यांची संख्या वाढल्याने या बिंबट्यांनी ठिकठिकाणी मेंढ्या, गायी, कुत्र्यांवर हल्ले करत त्यांना ठार केले आहे त्यामुळे शेतकर्‍यांन मध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे

राजू नरवडे,संगमनेर : संगमनेर तालुक्यासह पठारभागात यावर्षी बिबट्यांची संख्या वाढल्याने या बिंबट्यांनी ठिकठिकाणी मेंढ्या, गायी, कुत्र्यांवर हल्ले करत त्यांना ठार केले आहे त्यामुळे शेतकर्‍यांन मध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र या बिबट्यांपासून आपल्या मेंढ्यांचा बचाव व्हावा म्हणून एका मेंढपाळाने शक्कल लढवत वाघुरीत विजेचा प्रकाश केला आहे.

यावर्षी संगमनेर तालुक्यासह पठारभागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढली असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे या बिंबट्यांनी अनेकदा माणसांवरही हल्ले केले आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी भरणे सुद्धा शेतकर्‍यांना अवघड झाले आहे पिंजरे लावूनही बिबटे पिंजर्‍यात जेरबंद होत नसल्याचे पाहवयास मिळाले आहे तसेच सध्या नांदूर खंदरमाळ, घारगाव ,आदि ठिकाणी मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी परिसरात घेवून आले आहेत अनेकदा मेंढ्यांवरही बिबट्याने हल्ले करून मेंढ्याचा फडशा पाडला आहे.

त्यामुळे बिबट्यांपासून आपल्या मेंढ्यांचे सौरक्षण व्हावे म्हणून धोंडीभाऊ बिचकुले या मेंढपाळाने वाघुरीत विजेचा प्रकाश केला आहे बिबट्या याठिकाणी येणार नाही आला तरी त्याचे डोळे विजेच्या प्रकाशाने चमकतील त्याला मेंढ्यांवर हल्ला करता येणार नाही म्हणून ही शक्कल लढवली आहे ज्या ठिकाणी मेंढ्यांचा मुक्काम आहे त्याठिकाणी असलेल्या शेतकऱच्या घरात बॅटरी चार्चीग करायची किंवा रात्रभर तेथून लाईट घ्यायची आणी वाघुरीत विजेचा प्रकाश करायचा असेही यावेळी या मेंढपाळाने सांगीतले.