प्राथमिक शिक्षकांमधील गुणवत्ता समाजासाठी दिशादर्शक : प्रवीण ठुबे 

संगमनेर : शालेय विकासाबरोबर समाजामध्ये गुणवत्तापूर्ण विकासासाठी प्राथमिक शिक्षकांचे योगदान महत्वपूर्ण मानले जाते. शिक्षणामुळे व्यक्तीची वेगळी ओळख निर्माण होते. त्याचबरोबर समाजातील सर्व घटकांना शिक्षण प्रवाहाकडे ओढ निर्माण करण्याच्या दृष्टीने प्राथमिक शिक्षक निश्चित दिशादर्शक असल्याचे मत अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले.

संगमनेर : शालेय विकासाबरोबर समाजामध्ये गुणवत्तापूर्ण विकासासाठी प्राथमिक शिक्षकांचे योगदान महत्वपूर्ण मानले जाते. शिक्षणामुळे व्यक्तीची वेगळी ओळख निर्माण होते. त्याचबरोबर समाजातील सर्व घटकांना शिक्षण प्रवाहाकडे ओढ निर्माण करण्याच्या दृष्टीने प्राथमिक शिक्षक निश्चित दिशादर्शक असल्याचे मत अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवदवाडी खंदरमाळ, ता.संगमनेर येथील पदवीधर प्राथमिक शिक्षक राजेंद्र नामदेव भोजणे हे आजवर शैक्षणिक प्रवाहात स्वत:ला अद्ययावत ठेवण्याचे काम करत आहेत.अलीकडे देशपातळीवरील नेट परीक्षेच्या घोषित झालेल्या निकालामध्ये त्यांनी यश संपादन केले आहे. संपूर्ण भारतातून अनुसूचित-जमाती संवर्गातून अनेक उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यापैकी फक्त१ १३ उमेदवार पात्र झाले असून भोजणे यांचा त्यामध्ये समावेश झालेला आहे. अशा प्रकारचे यश मिळविणारे ते आदिवासी भागातील एक प्राथमिक शिक्षक आहेत.

शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या या प्राथमिक शिक्षकाने आजवर मराठी, हिंदी, इतिहास विषयांत बी. ए. आणि मराठी, हिंदी आणि एज्युकेशनल कम्युनिकेशन या विषयात एम.ए. पूर्ण केले आहे. ते हिंदी विषयात सेट आणि मराठीमध्ये नेट परीक्षा पात्र झाले आहेत. त्याचबरोबर शिक्षणशास्त्र विषयात त्यांनी सेट आणि नेट दोन्ही परीक्षामध्ये दुहेरी यश संपादन केले आहे. त्यांनी यापूर्वी एम. फिल. (शिक्षणशास्त्र) विषयामध्ये संशोधन कार्य पूर्ण केले आहे. सध्या त्यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथून सायबर सुरक्षा या विषयांतर्गत पीएच. डी.स्तरावर संशोधनाचे कार्य प्रगती पथावर आहे.

तसेच भाऊसाहेब ढोकरे यांची अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा घारगाव परिसरातील शिक्षकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.जुनी पेन्शन हक्क समितीचे राज्य प्रतिनिधी बाबुराव कदम यांचाही वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुकुल मंडळाचे तालुकाध्यक्ष गोकुळ कहाणे, आर.पी.रहाणे, शिवाजी आव्हाड, माळवदवाडी शाळेचे माजी मुख्याध्यापक दत्तात्रय सुपेकर, सीताराम बांबळे, प्रल्हाद रोकडे, बाबू शेळके, सतीश भुतांबरे, सुनीता सांगळे, हेमंत लोहकरे, गौतम गायकवाड, अशोक साळवे, केशव भालके, युवराज वायळ, शांताराम तळपे, गणेश वाघ, अशोक मधे, विक्रांत मते, मारुती पवार, गणपत लोहकरे, शांताराम ढेरंगे, अण्णा शिंदे, विकास खेबडे, युवराज भाईक, ज्ञानदेव दाते, प्रदीप उकांडे, प्रकाश कुलाळ, नीलेश हारदे, बाळासाहेब कडाळे, विमा प्रतिनिधी बी.के.जोशी यांचेसह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.