साईबाबा संस्थान ट्रस्टी अधिकारावर गदा कायम

    शिर्डी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : साई संस्थानच्या (Shri Saibaba Sansthan Trust) नवनियुक्त विश्वस्त मंडळाच्या अडचणीत वाढ कायम राहिली आहे. उच्च न्यायालयाने नवनियुक्त विश्वस्त मंडळाचे गोठवलेले अधिकार कायम ठेवत त्यावर 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्त्याचे वकील अजिंक्य काळे (Ajinkya Kale) यांनी दिली.

    साईबाबा संस्थानवर 16 सप्टेंबरला नव्याने नेमलेले अकरा सदस्यांची नेमणुकीबाबत शासनाने न्यायालयाला कोणतीही माहिती न देता नव्या विश्वस्तांनी पदभार स्वीकारला होता. त्यामुळे 21 सप्टेंबरला नवनियुक्त विश्वस्त मंडळाने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. तोपर्यंत संस्थानचा कारभार चार सदसीय तदर्थ समितीच पाहणारे असल्याचे ही न्यायालयाने सांगितले होते.

    या प्रकरणाची आज औरंगाबाद उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यात विश्वस्त मंडळाचे गोठवलेले अधिकार कायम ठेवत यावर येत्या 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्याचे वकील अजिंक्य काळे यांनी ही माहिती दिली.