लघुपट निर्मिती व प्रस्तुती हा नाविन्यपूर्ण उपक्रम : कृष्णा बेलगावकर

    नेवासा : लघुपट निर्मिती व प्रस्तुती हा नाविन्यपुर्ण उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्यावतीने श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथे ‘लघुपट निर्मिती व प्रस्तुती’ या विषयी द पब्लिक ब्रॉडकास्ट मिडियाचे संपादक व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कृष्णा बेलगावकर यांचे व्याख्यानाने आयोजित करण्यात आला.

    यावेळी त्यांच्या अनलॉक स्टोरी या राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लघुपटाचे स्क्रिंनिग देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी व या विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ.किशोर धनवटे यांनी केले. जिल्हा परिषद कर्मचारी व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विलास वाघ,प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे व यश संवाद विभाग प्रमुख प्रा.देविदास साळुंके यांनी सावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

    यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच मराठी विभाग प्रमुख डॉ.वसंत सपकाळ,वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ.सुरेश काळे,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. संजय शिंदे व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गणेश पवार यावेळी उपस्थित होते.