
गेल्या काही वर्षांपासून पाथर्डी पोलीस ठाण्यात प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी व त्यांच्या टीमने तपास लावून गुन्ह्यांची निर्गती केली आहे.पोलीस निरीक्षक,अधिकारी व कर्मचारी यांचे काम कौतुकास्पद असून आगामी काळात नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढवा असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले.
पाथर्डी : गेल्या काही वर्षांपासून पाथर्डी पोलीस ठाण्यात प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी व त्यांच्या टीमने तपास लावून गुन्ह्यांची निर्गती केली आहे.पोलीस निरीक्षक,अधिकारी व कर्मचारी यांचे काम कौतुकास्पद असून आगामी काळात नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढवा असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले.
पाथर्डी पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी आलेले जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील आयोजित पत्रकार परीषदेत बोलत होते.यावेळी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे,प्रविण पाटील,श्रीकांत डांगे,कौशल्यरामनिरंजन वाघ यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते.यावेळी मनोज पाटील यांनी पाथर्डी पोलिसांकडून मानवंदना स्वीकारली.तसेच गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या प्रलंबित असलेल्या १५४० गुन्ह्यांपैकी १३७६ गुन्ह्यांचे जलदगतीने पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी निर्गतिकरण केले. यावेळी उत्कृष्ट काम केले म्हणून पोलीस नाईक जॉन भिंगारदिवे,आजीनाथ बडे,सुहास बटुळे,सचिन नवगिरे,ज्ञानेश्वर रसाळ यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलतांना पाटील म्हणाले,पाथर्डीत येण्यासाठी कुणीही अधिकारी तयार नव्हता.मात्र पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण व त्यांच्या टिमने अतिशय चांगले काम केले आहे.आगामी काळात आणखी चांगले काम करण्याची गरज आहे.पुढील सहा महीन्यात चोरट्यावर आळा घालणे, गुन्ह्याच्या तपासाचा दर्जा उंचावणे,आरोपींना तातडीने अटक करणे,अवैध व्यवसाय व गुन्हेगारी मोडीत काढणे अशी कामे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करावीत.पोलीस सामान्य नागरीकाला आपल्या सेवेसाठी व मदतीसाठी आहेत अशी जनभावना नागरिकांमध्ये निर्माण झाली पाहीजे.काम करणा-या चांगल्या अधिका-यांचा गौरव करण्याचे काम आम्ही नक्की करु असे सांगत पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या कामाचे कौतुक केले.