एसटीचा संप खासगी वाहतूकदारांच्या पथ्थ्यावर, नगर-पुणे ५०० तर आळेफाटा कल्याण ८०० रुपये भाडे

कोरना काळातील तोटा भरुन काढण्याची नामी संधी असे याकडे खासगी वाहतूकदार पाहत आहेत. नोकरीच्या ठिकाणी परतायचे असल्याने नागरिकांपुढेही दुसरा पर्याय नाहीये. प्रशासनाच्या पातळीवरही यावर कोणताच अंकुश राहिलेला नाही. रविवारी दुपारनंतर मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरला जाणार्यांची मोठी संख्या एसटी डेपोच्या परिसरात होती. एसटी सेवा ठप्प झाल्याने खासगी वाहतूकदार वाट्टेल ती भाडे सांगतायेते आणि प्रवाशांनाही नाईलाजाने ते द्यावे लागत आहेत.

    अहमदनगर- ऐन दिवाळीच्या काळात एसटी कर्मचाऱअयांनी पुकारलेल्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची चंगलीच गौर सोय झआली आहे. तर खासगी वाहतूकदारांनी मात्र या संधीचा पुरेपूर पफायदा करुन घअयायचे ठरवलेले दिसते आहे. दिवाळीच्या आधी एसटीच्या तुरळक गाड्या तरी सुटत होत्या. त्यामुळे अनेके जण दिवाळीसाठी गावी गेले होते. शनिवारी रात्रीपासून संपाची तीव्रता वाढल्याने एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसते आहे. आता सर्वच संघटना यात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी आता सर्वसामान्य प्रवाशआंना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.

    खासगी वाहतूकदार यानिमित्ताने प्रवाशआंची लूट करताना दिसत आहेत. नगरहून पुण्याल जाण्यासाठी अनेकांना पाचशे किंवा त्याहून जास्त भाडे मोजावे लागत आहे. तर आळेफाटा ते कल्याण प्रवासासाठी सातशे ते आठशे रुपये द्यावे लागत आहेत. राज्याच्या ग्रामीण भआगात थओड्या फार फरकाने अशीच लूटमार सुरु आहे.

    मनमानी पद्धतीने भाडे आकारणी