बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप

बँक व्यवस्थापनाच्या या धोरणामुळे ग्राहकांना जो त्रास सहन करावा लागतो आहे त्याबद्दल चारही संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. मात्र याचा फटका बँकेतील ग्राहकांना बसला असून यावेळी नागरिकांनी आपला रोषही यावेळी व्यक्त केला आहे.

    अहमदनगर: कोपरगाव तालुक्यासह राज्यातील बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारण्यात आला असून कोपरगाव शहरासह तालुक्यातील कोपरगाव,येसगाव,दहेगाव बोलका,कोकमठाण व शिर्डी शाखेतील कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसत एक दिवसीय लाक्षणिक संप करत बँक ऑफ महाराष्ट्र कोपरगाव शाखाधिकारी यांना यावेळी विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
    या निवेदनात त्यांनी मागणी केली आहे की बँक ऑफ महाराष्ट्र ही बॅंकिंग क्षेत्रात अग्रेसर असणारी बँक आहे.   परंतु या बँकेत दिवसेंदिवस कर्मचारी संख्या कमी होते आहेत व विविध कामाचा बोजा कमी कर्मचाऱ्यांना येत आहे. त्यामुळे इच्छा असतानाही ग्राहकांना समाधानकारक सेवा देता येत नाही.

    या संपचा मुख्य हेतु हा नोकर भरतीचा आहे. अनेक वेळा मागण्या करून ही नोकर भरती झालेली नाही. बँक व्यवस्थापन नवीन कर्मचारी भरतीबाबतीत अत्यंत उदासीन आहे. त्यामुळेच पुढील प्रमुख मागण्यांसाठी बँकेच्या ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ, बॅंक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना व महाबँक नवनिर्माण सेना याचारही संघटनांनी एकत्र येऊन एक दिवसाचा संप पुकारला आहे.या संपच्या प्रमुख मागण्या अशा आहे की, सर्व शिपाई जागा भरणे, पुरेशी क्लार्क भरती करणे, सर्व हंगामी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेणे, बँक शाखा/एटीएम ठिकाणी सुरक्षारक्षक नेमणे, या मागण्यांबाबत व्यवस्थापनाने योग्य निर्णय पुढील काळात अधिक दिवस संपाची हाक संघटनेच्या वतीने देण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

    बँक व्यवस्थापनाच्या या धोरणामुळे ग्राहकांना जो त्रास सहन करावा लागतो आहे त्याबद्दल चारही संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. मात्र याचा फटका बँकेतील ग्राहकांना बसला असून यावेळी नागरिकांनी आपला रोषही यावेळी व्यक्त केला आहे.