कौठवाडी येथे २५ एकर क्षेत्राला अचानक आग; शेकडो वृक्ष,सरपटणारे प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी

वनविभागाचे वनक्षेत्रपाल जी.जी. गोंदके ,सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांचेकडे तक्रार करण्यात आली असून कोण्या अज्ञात व्यक्तींनी ही आग लावल्याचा आरोप शंकर साबळे यांनी केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले .तर त्यांच्या पत्नी सौ.इंदिरा म्हणाल्या की,माझे पती व सासरे घरी नसताना ही आग लागून खळ्यावरील चाऱ्यासाठी ठेवलेल्या पेंढ्याचे मोठे नुकसान झाले आहे.या घटनेचा कामगार तलाठी यांनी पंचनामा केला आहे.

    अकोले : सुमारे २५ एकर क्षेत्राला आग लागून शेकडो वृक्ष,सरपटणारे प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना अकोले तालुक्यातील कौठवाडी येथे आज दुपारच्या सुमारास घडली.तालुक्यातील कौठवाडी शिवारातील काशिनाथ साबळे,शंकर साबळे हे घरी नसताना अचानक दुपारच्या सुमारास आग लागून सुमारे २५ एकरावर ही आग पसरली.जांभूळ,आंबा,काजू,बदाम,चिकू आदी १०० हुन अधिक फळझाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली .दुपारी प्रचंड ऊन व त्यात आग लागल्याने परिसरातील सरपटणारे प्राणी या आगीच्या भक्ष्यस्थानी आले.

    काशिनाथ साबळे यांच्या खळ्यावर असणारे २५० पेंढेही जळून खाक झाले.दरम्यान यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. इंदिरा साबळे यांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरडा करत या घटनेकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले.ही आग घराकडे सरकू लागल्याने त्यांनी व त्यांचा मुलगा या दोघांनी हौदात असलेल्या पाण्याने ती आग विझविण्यासाठी प्रयत्न करत घर आगीच्या भक्षस्थानी पडण्यापासून वाचविले.

    याबाबत वनविभागाचे वनक्षेत्रपाल जी.जी. गोंदके ,सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांचेकडे तक्रार करण्यात आली असून कोण्या अज्ञात व्यक्तींनी ही आग लावल्याचा आरोप शंकर साबळे यांनी केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले .तर त्यांच्या पत्नी सौ.इंदिरा म्हणाल्या की,माझे पती व सासरे घरी नसताना ही आग लागून खळ्यावरील चाऱ्यासाठी ठेवलेल्या पेंढ्याचे मोठे नुकसान झाले आहे.या घटनेचा कामगार तलाठी यांनी पंचनामा केला आहे.