निमजला शेताच्या कडेला आढळले बिबट मादीचे बछडे ; वनविभागाने बछाड्यांना सोडले बिबट मादीच्या सहवासात  

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील निमज येथे सोमवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी एका शेतकर्‍याच्या शेताच्याकडेला बिबट मादीचे तीन बछडे आढळून आले होते. यानंतर वनविभागाचे वनरक्षक सी.डी  कासार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या तीन्ही बछड्यांना शेजारीच असलेल्या ऊसाच्या शेतात बिबट मादीच्या सहवासात सोडून दिले आहे.

याबाबत माहिती अशी की, निमज याठिकाणी शेताच्या कडेला बिबट मादीचे तीन बछडे असल्याची माहिती नागरिकांनी मोबाईलवरून वनविभागाचे वनरक्षक सी.डी कासार यांना दिली. माहिती समजातच कासार यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर त्यांनी ते तीन्ही बछडे एका टोमॅटोच्या मोकळ्या कॅरेटमध्ये ठेवून ते शेजारी असलेल्या ऊसाच्या शेतात बिबट मादीच्या सहवासात सोडून दिले आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बिबट मादीपासून या बछड्यांची ताटातूट करता येणार नाही म्हणून हे तीन्ही बछडे  बिबट मादीच्या सहवासात सोडून देण्यात आले आहेत.

दरम्यान धांदरफळ, निमज हा संपूर्ण भाग प्रवरा नदीकाठी वसलेला असून येथे मोठ्या प्रमाणात उसाचे मळे आहेत.त्यामुळे या भागात बिबट्यांची संख्याही मोठी आहे . तसेच हे बिबटे ऊसाच्या शेताचा आसरा घेत असतात. यामुळे वारंवार शेतकर्‍यांना बिबट्यांचे दर्शन होत असते पण आता शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.