crime

संगमनेर: शहरातील बसस्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलेच्या पर्समधून सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी (ता.२५) घडली होती. बुधवारी (ता.३०) संबंधित महिलेने संगमनेर शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी दोन दिवसांपूर्वी राजूर पोलिसांनी गंठण चोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. आता शहर पोलिसांसमोरही चोरांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान ठाकले आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील चिखली येथील साधना अण्णासाहेब हासे ही महिला शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संगमनेर बसस्थानकातून नाशिक-पुणे बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने संधीचा फायदा घेत आल्हादपणे महिलेच्या पर्समधून एक तोळा वजनाची सोन्याची चैन, दोन तोळा वजनाचे सोन्याचे गंठण, चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे टाप्स, सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र असा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी साधना हासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरनं.२०६७/२०२० भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विजय खाडे हे करत आहे. तत्पूर्वी राजूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने गंठण चोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांसमोर चोरांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान ठाकले आहे.