हॉटेलमध्ये सुरु होता वेश्याव्यवसाय; पोलिसांना मिळाली माहिती अन् टाकला छापा

नगर-दौंड रोडवरील खंडाळा गावाच्या शिवारातील हॉटेल राजयोगवर पोलिसांनी छापेमारी करत देहविक्री करणाऱ्या दोन मुलींची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकांसह पाच जणांना अटक केली.

    अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : नगर-दौंड रोडवरील खंडाळा गावाच्या शिवारातील हॉटेल राजयोगवर पोलिसांनी छापेमारी करत देहविक्री करणाऱ्या दोन मुलींची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकांसह पाच जणांना अटक केली.

    महिलांना व मुलींना देवी करण्यासाठी बोलावून घेऊन त्यांच्यामार्फत कुंटणखाना सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली. सानप यांच्यासह पीएसआय धनराज धनराज जरावाल, सहाय्यक फौजदार जब्बार रहीमखों पठाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश गांगुर्डे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक मरकड, पोलीस कॉन्स्टेबल धर्मराज दहिफळे, पोलीस कॉन्स्टेबल साठे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड, महिला हेडकॉन्स्टेबल कविता हरिचंद्रे यांच्या पथकाने छापेमारी करत दोन मुलींची सुटका केली.

    नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल मालक अक्षय अनिल कर्डिले आणि त्याचा भाऊ सौरभ अनिल कर्डिले (दोघेही रा. खंडाळा) आणि एजंट विकी मनोहरलाल शर्मा (रा. अरणगाव रोड),गणेश मनोहर लाड (रा. वाळकी) आणि संदीप पंडित जाधव (रा. खंडाळा) यांना अटक केली आहे.