crime

अहमदनगर : चोर तो चोर वर शिरजोर या म्हणीला साजेशी कृती अहमदनगर मधील दरोडेखोरांनी केली आहे. दरवाजा उघडायला उशीर केला म्हणून चिडलेल्या दरोडेखोरांनी एका महिलेचे कान तोडले आहेत.

अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा गावात आज पहाटे दरोडा पडला. दरोडेखोरांनी महिलेवर हल्ला केला. तसेच तिच्या कानातील आणि गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला.

महादेव जाधव आणि विमल जाधव या ज्येष्ठ दामप्त्याच्या घरी हा दरडा पडला. सुरवातीला दरोडेखोरांनी घराची कडी वाजविली. प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा उघडण्यासाठी धमकावले. शेवटी दरवाजा उघडला गेला. दरोडेखोरांनी आत येताच विमल जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावले. यात विमल यांच्या कानाच्या दोन्ही पाळ्या तुटल्या आहेत.