आदिवासी विद्यार्थ्यांना मिळाला पासवर्ड

अकोले : तालुक्यातील आदिवासी पट्ट्या मधील सुमारे १७ शाळांवर बायफ संचलित व जनरल मिल्स पुरस्कृत आदिवासी विकास कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक विकासाचे काम केले जात आहे. याच प्रकल्पाचा भाग म्हणून सुमारे एक हजार मुलांना पासवर्ड अंकाचे नुकतेच वाटप करण्यात आले.

अकोले : तालुक्यातील आदिवासी पट्ट्या मधील सुमारे १७ शाळांवर बायफ संचलित व जनरल मिल्स पुरस्कृत आदिवासी विकास कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक विकासाचे काम केले जात आहे. याच प्रकल्पाचा भाग म्हणून सुमारे एक हजार मुलांना पासवर्ड अंकाचे नुकतेच वाटप करण्यात आले.

पुणे येथील युनिक फ्युचर्स अँड न्यूज प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांपर्यंत पासवर्ड अंकाचे वितरण करण्यात आलेले आहे .युनिक फ्युचरच्या माध्यमाने मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी विविध विषयांचे त्यांना आकलन व्हावे व त्यातूनच अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी गेली २५ वर्ष युनिक फ्युचर्स कार्य करत आहे.त्यांच्या अनुभवाचा आपल्या आदिवासी भागातील मुलांना फायदा व्हावा व मुलांना वाचन आणि मनन करण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातिल मान्हेरे येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पुणे येथून आलेले युनिक फ्यूचरचे तज्ञ मार्गदर्शक धनंजय जोगळेकर व मृणालिनी ठिपसे , बायफ चे नाशिक विभागीय अधिकारी जीतीन साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .मुलांशी संवाद साधताना धनंजय जोगळेकर यांनी वाचन संस्कृती रुजवण्यासाठी शिक्षकांनी विशेष योगदान दिले पाहिजे यावर भर दिला व युनिक फ्युचर्स म्हणजे वाचन संस्कृती वाढवणारे एकमेव द्वितीय इन्स्टिट्यूट आहे .तसेच छापील साहित्य हल्ली निर्माण होत नाही त्यातून दर्जेदार छापील साहित्य निर्माण करून युनिक फ्युचर्स विद्यार्थ्यांच्या आयुष्याची शिदोरी निर्माण करत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले .आपल्या मार्गदर्शन पर संवादात मृणालिनी ठीपसे यांनी वाचनातून कल्पकता वाढीस लागते. वाचनाने माणूस समृद्ध होतो. समाजातील जे जे लोक मोठी झालेत व इतरांसाठी आदर्श ठरली त्यामागे त्यांनी वाचन केलेले साहित्य व पुस्तके यांचा खूप मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले .वाचनातून मुलांमध्ये प्रगल्भता निर्माण होऊन त्यांचे विचार वाढीस लागतात. युनिक फीचर्स तर्फे आदिवासी भागातील मुलांची वाचन आणि आकलन शक्ती वाढावी म्हणून निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन केले जाईल असेही त्यांनी सांगितले .आदिवासी मुलांची कला व संस्कृती यांना पासवर्डच्या अंकामध्ये विशेष स्थान दिले जाईल हेही त्यांनी नमूद केले .पासवर्डचा दिवाळी अंक व करोना रोगावर आधारित अख्ख्या जगाला मास्क नावाचा पासवर्ड अंक यावेळी मुलांना देण्यात आला. मुलांनी या अंकाचे वाचन सर्वांसमोर केले व त्यातील गमतीजमती समजून घेतल्या. प्रकल्पातील समाविष्ट शेणित ,देवगाव ,मा, मुतखेल या गावांमधील शाळेतील मुलांना सुमारे एक हजार अंक यावेळेस वितरित करण्यात आले. पासवर्ड अंकातून मुलांना लेखन, वाचन, कला, विज्ञान इत्यादी विविध विषयांचे आकलन व विशेष म्हणजे वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे . यानिमित्त खऱ्या अर्थाने आदिवासी विद्यार्थ्यांना ज्ञानाचा पासवर्ड मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात शाळेपासून कित्येक महिने दूर राहिलेल्या मुलांना पासवर्ड च्या माध्यमाने पुन्हा एकदा वाचन आणि अभ्यासात जोडता येणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बायफचे केंद्र समन्वयक राम कोतवाल यांनी केले तर उपक्रमाचे सुयोग्य नियोजन बायफ चे मच्छिंद्र मुंडे यांनी केले .याप्रसंगी शेनीत, मान्हेरे,मुतखेल, देवगाव या शाळेतील शिक्षक वृंद मोठ्या संख्येने हजर होते. याप्रसंगी  एस .आर बर्मन,  चौधरी बी. एस, गभाले व्ही .के व होलगिर डी. टी, पवार अजय ,कोल्हाळ आर.जी ,झडे जे. एल,भागडे आर. टी हे शिक्षकवृंद मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित होते. तसेच बचत गटांच्या समन्वयक ज्योती धराडे याही उपस्थित होत्या.