माजी आ.वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली मेहेंदुरी येथील निळवंडे धरणाच्या डाव्या कॅनॉलचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले

अकोले : तालुक्यातील मेहेंदुरी येथील निळवंडे धरणाच्या डाव्या कॅनॉलचे सुरु असलेले काम आज सोमवार दि.२१ डिसेंबर रोजी मेहेंदुरी येथील शेतकरी एकत्र येत माजी आ. वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी बंद पाडले

अकोले : तालुक्यातील मेहेंदुरी येथील निळवंडे धरणाच्या डाव्या कॅनॉलचे सुरु असलेले काम आज सोमवार दि.२१ डिसेंबर रोजी मेहेंदुरी येथील शेतकरी एकत्र येत माजी आ. वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी बंद पाडले.

मेहेंदुरी फाटा ते फरगडे वस्तीपर्यंत निळवंडेच्या डाव्या कालव्याचे काम जोरात सुरु आहे. मात्र संबंधित ठेकेदार बेजबाबदारपणे काम करीत असून कॅनालच्या कडेच्या शेतकर्‍यांना वेठीस धरीत असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. या ठेकेदाराने अनेक ठिकाणी शिवार रस्ते खोदून ठेवल्याने अनेक शेतकर्‍यांचा ऊस तोडणीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तसेच हे काम करीत असताना अनेक ठिकाणी पाईपलाईन उखडल्याने अनेक पाईपलाईन बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कॅनॉलच्या कडेच्या शेतकर्‍यांच्या घराशेजारीच सुमारे १० ते १५ फुटांचे खड्डे संबंधित ठेकेदाराने केले असून त्या खड्डयांमध्ये जनावरे व छोटी मुले पडल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या. संबंधित अधिकार्‍यांना शेतकर्‍यांनी या गोष्टीची कल्पना दिली नंतरही अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी काम बंद पाडले. यावेळी संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी पाटबंधारे अधिकारी श्री. वाणी यांना घेराव घालण्यात आला.

शेतकर्‍याची गैरसोय होऊन देऊ नका, अन्यथा गाठ माझ्याशी आहे. प्रथम शेतकर्‍यांच्या सर्व अडचणी दुर करा, मगच कॅनॉलचे काम सुरू करा अन्यथा आम्हाला यापेक्षा उग्र आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा वैभवराव पिचड यांनी दिला.यावेळी संजय फरगडे, गिरजाजी जाधव, यशवंत आभाळे, अमोल येवले, सुधाकर आरोटे, राहुल देशमुख, विकास बंगाळ, कैलास आरोटे, नाजीम शेख, पांडुरंग फरगडे, विलास येवले, भाऊसाहेब येवले, अशोक पाडेकर, राहुल शिंदे, मनोज वावळेआदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.