केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले दोन दिवसांच्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

अकोले : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे दि.२७,२८ डिसेंबर रोजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून उत्तर महाराष्ट्रची विभागीय बैठक घेणार असल्याची माहिती रिपाइंचे जिल्हाप्रसिद्धी प्रमुख राजेंद्र गवांदे यांनी आज अकोले येथे दिली.

अकोले : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे दि.२७,२८ डिसेंबर रोजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून उत्तर महाराष्ट्रची विभागीय बैठक घेणार असल्याची माहिती रिपाइंचे जिल्हाप्रसिद्धी प्रमुख राजेंद्र गवांदे यांनी आज अकोले येथे दिली.रिपाईच्या वतीने प्रसिद्धीस दिलेले पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात अडचणीत असलेल्या लोकांना मोठया प्रमाणात मदत करणारे तसेच आपल्या निवासस्थानी रोज गरजु लोकांना भोजनदान देणारे आठवले लॉकडाऊन नंतर प्रथमच नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. कोरोनाला सामोरे जात असताना स्वतः कोरोनानावर मात केली.

रामदास आठवले दि. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पुण्याहून हिवरगाव पावसा येथे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांचे निवासस्थानी आगमन होईल. श्रीकांत भालेराव यांच्या मातोश्री दिवंगत सीताबाई तबाजी भालेराव यांचे दुःखद निधन झाले. कोरोनाचे सावट असल्याने भालेराव यांच्या कुटुंबाला सात्वनपर भेट देणे शक्य झाले नाही. भालेराव हे ना. आठवले यांचे विश्वासू सहकारी असल्याने ना.आठवले हे नेहमीच कार्यकर्त्यांच्या सुख दुःखात धावून जात असतात. श्रीकांत भालेराव हे राज्य कार्यकारिणीत उपाध्यक्ष असून अ.नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत. पँथरपासून ना.आठवले यांचे अतिशय विश्वासु सहकारी म्हणून ओळखले जातात. सायंकाळी सात वाजता शिर्डीकडे रवाना होतील. शिर्डी मुक्काम होईल. २८ डिसेंबर रोजी सकाळी १ वाजता उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक होणार आहे. या आढावा बैठकीत पक्ष बांधणी व सभासद मोहीम व अन्य सामाजिक विषयांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर सोयीनुसार मुंबईकडे रवाना होतील

तरी आठवले यांचे उपस्थितीत होणाऱ्या बैठकीस प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव विजयराव वाकचौरे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, विभागीय प्रमुख भीमा बागुल, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे, जेष्ठ नेते श्रावण वाघमारे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, दीपक गायकवाड, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक खरात, संघटक सुरेश देठे, शिर्डी शहराध्यक्ष कैलास शेजवळ, दिलीप मुंतोडे, माणिकराव यादव, आशिष शेळके, अमित काळे, रवींद्र शेजवळ, योगेश मुंतोडे, विजय खरात, कैलास कासार आदींनी केले आहे.