शेवगाव तालुक्यात सात गावात कलापथकाद्वारे समाजकल्याण विभागाच्या विविध योजनेच्या जनजागृती

    शेवगाव : पाथर्डीच्या श्री संतभूमी कला क्रीडा प्रतिष्ठानचे कलाकारांचा सहभाग तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन सहा. आयुक्त समाज कल्याण व जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर आयोजित अनुसूचित जाती उपाययोजनांची शेवगाव शहरासह तालुक्यात संत भूमी कला क्रीडा प्रतिष्ठान पाथर्डी कलापथकाद्वारे जनजागृती करण्यात आली.

    यामध्ये शहरटाकळी. भातकुडगाव, वरुर,आखेगाव. मुंगी, बोधेगाव, हातगाव आदी गावातङं वाडी वस्त्यांवर जाऊन गाण्यातून ढोलकीचा ठेका धरून सांगतात. त्याला लोक उत्तम प्रतिसाद देतात.

    अनु. जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांना एकत्र जमून त्यांच्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. राज्याचे ज्येष्ठ नागरिक धोरण अनु. जाती उपयोजना, स्टँड अप इंडिया, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरवणे. मुला मुलींसाठी शासकीय वस्तीगृह. निवासी शाळा सुरु करणे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना. भारत सरकार शिष्यवृत्ती. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य. कलावंत मानधन योजना, स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांना श्री संत भगवान बाबा वस्तीगृह. या सर्व यांची माहिती कलापथकाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले.

    कलापथकाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील योजनांची माहिती मागास वर्गीय समाजापर्यंत पोहोचवण्याचा समाज कल्याण चा उपक्रम व स्तुती आहे.

    हातगावचे सरपंचअरुण मातंग यांनी व्यक्त केले. गावातील यावेळी गावातील वंचित बहुजन आघाडीचे संघटक संजय मातंग. शिक्षण समितीचे सदस्य. चंद्रकांत मातंग. संजय मातंग. अशोक मातंग. विशाल साकत संदीप मातंग. अविनाश बुटे. अमोल मातंग. बन्सी मातंग. विजय मातंग. आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कला पथकाची सांगता हातगाव याठिकाणी करण्यात आली कला पथकाचे प्रमुख. संगीत विशारद. प्रा. जनार्धन बोडखे. चेतन सोनवणे. अजय वडागळे, सुरेखा बोडखे. बंडू कराड. चैतन्य सांगळे. राम काते. आदींनी आपली कला सादर केली.