असवुद्दीन ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षेची मागणी

या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शहा व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी  शहरातून निषेध मोर्चा काढला. हा निषेध मोर्चा काढण्यात आला, यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि केजरीवाल सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

    धुळे,  एम.आय.एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असवुद्दीन ओवेसी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शहा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झालेले बघायला मिळाले.

    या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शहा व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी  शहरातून निषेध मोर्चा काढला. हा निषेध मोर्चा काढण्यात आला, यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि केजरीवाल सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आमदार डॉ फारुख शहा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हा भ्याड हल्ला झाला यावेळी असवुद्दीन ओवेसी हे घरी नसल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे, मात्र मोदी सरकारने आम्हाला घाबरवण्याचे काम करू नये, आम्ही घाबरणारे नाही आहे. तसेच असवुद्दीन ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

    धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्युमाईन क्लब या ठिकाणी मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी आक्रमक झालेल्या आमदार डॉ. फारुख शहा यांच्यासह एम आय एम च्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.