अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामे नाहीत, शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याच्या शेतीत मेंढ्या घालून उद्ध्वस्त केले पीक

धुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा आणि कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मात्र या नुकसानीचे अद्याप पंचनामे करण्यात आले नसल्याने, येणारा दिवाळीचा सण साजरा करायचा तरी कसा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

    धुळे : धुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा आणि कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मात्र या नुकसानीचे अद्याप पंचनामे करण्यात आले नसल्याने, येणारा दिवाळीचा सण साजरा करायचा तरी कसा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

    संपूर्ण राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे धुळे जिल्ह्यात प्रामुख्याने कांदा आणि कपाशीचे पीक घेतले जाते, मात्र परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापूस देखील सडला आहे. कांद्याचे नुकसान झाल्याने चक्क शेतात शेळ्या आणि मेंढ्याना चरण्यासाठी सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेळ्या आणि मेंढ्यांच्या पोटासाठी आम्ही हे केल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.