धुळ्यात भरदिवसा चोरटे घरात घुसले अन्… रोकड, दागिन्यांसह होत्या नव्हतं सगळचं…

शहरातील देवपुर परिसरातील फॉरेस्ट कॉलनीत चोरट्यांनी निवृत्त जवानाचे घरफोडून ८० हजाराची रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केले. काल भरदिवसा ही घटना घडली. याप्रकरणी पश्‍चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

    धुळे : शहरातील देवपुर परिसरातील फॉरेस्ट कॉलनीत चोरट्यांनी निवृत्त जवानाचे घरफोडून ८० हजाराची रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केले. काल भरदिवसा ही घटना घडली. याप्रकरणी पश्‍चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

    देवपुरातील फॉरेस्ट कॉलनीत प्लॉट नं.१३३ येथे सैन्य दलातील सेवानिवृत्त आणि सध्या वनविभागात कार्यरत असलेले अशोक भाईदास पाटील हे राहतात. काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ते घरबंद करुन कामासाठी गावात आले होते. एक दिड तासानंतर काम आटोपून घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात प्रवेश केला असता त्यांना मागील दरवाजाचा कडीकोंडा तुटलेल्या दिसून आला.

    चोरट्यांनी मागील दरवाजाने घरात शिरकाव करत घरातील ८० हजाराची रोकड,३ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या , सोन्याची नथ,अंगठी,किल्लू,साखळ्या असा ५ ते ६ तोळे वजनाचा सोन्याचे दागिने तसेच ७ हजार रुपये चांदीच्या साखळ्या,दोन जळवे,चांदीची गाय,वासरु,मुर्ती, गणपतीची मुर्ती चोरट्यांनी चोरट्यांनी लंपास केले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पश्चिम देवपुर पोलिस ठाण्यचो निरीक्षक रविंद्र देशमुख, सपोनि मैनुद्दीन सैय्यद हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच ठसे तज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.