धुळे महापालिका भाजपचीच; प्रदीप करपे यांची महापौरपदी बहुमताने निवड

    धुळे (Dhule) : धुळे महापालिकेच्या (Dhule Municipal Corporation) दुसऱ्या टर्नसाठी महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया आज धुळे मनपात ऑनलाईन पद्धतीने पार पडली. धुळे महापालिकेतील महापौर निवडीतही (mayoral election) भाजपचा करेक्‍ट कार्यक्रम लागणार का? असा प्रश्‍न सर्वांसमोर होता; मात्र भाजपने महापालिकेवरील सत्‍ता कायम राखत महापौर पदाची धुरा प्रदीप करपे (Pradip Karpe) यांच्‍याकडे सोपविली आहे.

    गेल्या काही महिन्यांपासून महापौर आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायप्रविष्ट असलेल्या महापौर पदासाठी ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर धुळे महापालिका महापौरपदाची निवडणूक प्रक्रीया पार पडली. यामध्ये धुळे महानगरपालिकेत ७४ पैकी ५० नगरसेवकनी ऑनलाईन पद्धतीने प्रदीप कर्पे यांना मतदान करून विजय मिळवला.