Fake vaccination certificate case; Four arrested along with municipal officials

धुळे महानगरपालिकेच्या अंतर्गत कोरोना लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाल्याची चित्र पाहावयास मिळत आहे. यावर पोलिसांनी  तातडीने पाऊले उचलून या प्रकरणातील आरोपीना अटक केली आहे.

    धुळे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याच शासकीय किंवा खाजगी कामात कोरोना लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मात्र, लस न घेता खोटी प्रमानपत्र तयार केलीय जात असल्याची माहिती उघडकीस आली होती. त्या प्रकरणी बनावट लसीकरण प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या धुळे महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांसह आणखी दोन अधिकारी व एका कंत्राटी कर्मचाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी भल्या पहाटे केली आहे.

    लसीकरण न करता मोठ्या प्रमाणात खोट्या प्रमाणपत्राचे वितरण ही नागरिकांना जीवाशी खेळणारी गोष्ट आहे. लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्याचे खोटे प्रमाणपत्र वितरित करणे हा गुन्हा आहे. कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेमध्ये धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फेच हा नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू होता.

    पोलीस प्रशासनातर्फे या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला असून अखेर आज भल्या पहाटे संबंधित चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला होता, आता या प्रकरणामध्ये मोठ्या अधिकार्‍यांसह चार जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने काही निर्बंध घातले आहेत. त्यात प्रवास किंवा सार्वजनिक ठिकाणी लसीचे दोन डोस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य केले आहे. यात नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार केलेला आहे.