The first ST bus in Vidarbha departed from Bhandara district; A total of 44 passengers were escorted by the police

मागे-पुढे पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना धुळे आगारात चार बसेसची तोडफोड झाली आहे(Four buses vandalized at Dhule depot while police were on high alert; ST driver injured). यात एसटी चालक जखमी झाला आहे.

    धुळे : मागे-पुढे पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना धुळे आगारात चार बसेसची तोडफोड झाली आहे(Four buses vandalized at Dhule depot while police were on high alert; ST driver injured). यात एसटी चालक जखमी झाला आहे.

    धुळे आगारातून बाहेर पडलेल्या चार एसटींची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. यात एक एसटी चालक जखमीही झाला आहे. संप मिटू शकत नाही हे पाहिल्यावर संप फोडण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, असा आरोप करत कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आत्तापर्यंत हजारो कामगारांचे निलंबन आणि बडतर्फी सरकारने केली आहे.

    आंदोलन स्थगित होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने धुळे आगारातून पोलिस संरक्षणात बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभाग नियंत्रक मनीषा सपकाळे यांच्या आदेशानुसार धुळे आगारातून नरडाणा आणि धनुर येथे जाण्यासाठी बसेस काढण्यात आल्या. यावेळी भरती झालेले मात्र नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या चालक आणि वाहकांच्या मदतीने बस काढण्यात आल्या.