जोपर्यंत रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत.., अब्दुल सत्तारांची नवी खेळी

धुळ्यातील शिवसेना मेळाव्यात बोलताना सत्तार यांनी भाजपावर जोरदार टीका केली. जोपर्यंत रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असं आव्हानच अब्दुल सत्तार यांनी केलंय.

धुळे : राज्यभरात कोरोना विषाणूचा संसर्ग अद्यापही घोंघावत आहे. तरीसुद्धा अशा परिस्थितीत राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत आहे. निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा अशी चुरस पाहायला मिळत आहे. दरम्यान, जोपर्यंत रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असं म्हणत महसूल व ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.

धुळ्यातील शिवसेना मेळाव्यात बोलताना सत्तार यांनी भाजपावर जोरदार टीका केली. जोपर्यंत रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असं आव्हानच अब्दुल सत्तार यांनी केलंय. भाजपाचे राजकारण म्हणजे मुँह मे राम बगल मे सुरी असंच आहे. राम मंदिराच्या नावाखाली भाजपाचं राजकारण सुरूयं, असे सत्तार यांनी म्हटले.

तसेच, आगामी ग्रामपंचायत निवडणुका ह्या केवळ निवडणुका नसून भाजपला धडा शिकवण्याची संधी असल्याचे समजून कामाला लागा, असे आवाहनही सत्तार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.