प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

या माहितीच्या आधारे पोलिस अधिकाऱ्यांनी पथक तयार करून माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ट्रक मधील चालकाने पोलीस बघताच ट्रक सोडून पळ काढला. त्यास पकडण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. परंतु चालक पळून जाण्यात यशस्वी झाला.

     धुळे – जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात हाडाखेड गावाजवळील शेरे पंजाब हॉटेल जवळ HR 55 S 4908 या क्रमांकाचा ट्रक सौंषयीतरित्या उभा असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिस सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट यांना गुप्त माहिती दाराकडून मिळाली होती.

    या माहितीच्या आधारे पोलिस अधिकाऱ्यांनी पथक तयार करून माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ट्रक मधील चालकाने पोलीस बघताच ट्रक सोडून पळ काढला. त्यास पकडण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. परंतु चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. संबंधित ट्रक पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधी पानमसाला व गुटखा पोलिसांना आढळून आला आहे.

    कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल 43 लाख 38 हजार रुपयांचा गुटखा व 15 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 58 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.