आमदार अमरिष पटेल यांचे वर्चस्व ; जिल्हा बॅंक ‘शेतकरी पॅनल’कडे

साक्री तालुक्यातून हर्षवर्धन शिवाजीराव दहिते यांनी ५२ मते मिळवित विजय मिळविला. त्यांनी अक्षय पोपटराव सोनवणे यांचा पराभव केला. सोनवणे यांना २५ मते मिळाली. नवापूर तालुक्यातून अमरसिंग हुरजी गावीत यांनी १३ मते मिळवित अभिमन फुलसिंग वसावे याचा पराभव केला.

  धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आमदार अमरिशभाई पटेल व जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आ. राजवर्धन कदमबांडे तसेच धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व राखले आहे.

  ‘कहीं खुशी, कहीं गम’
  बँकेच्या १० जागांसाठी काल धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील १७ केंद्रांत ९८ टक्के मतदान झाले. तर आज पारस मंगल कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. अकरा वाजता निकाल जाहिर करण्यात आला. यात सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलतर्फे राजवर्धन कदमबांडे, हर्षवर्धन दहिते, राजेंद्र देसले, अमरसिंग गावीत, शिलाताई विजय पाटील, सिमा तुषार रंधे, दर्यावगिर महंत यांचा विजय झाला आहे. तसेच किसान संघर्ष पॅनलमधून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आ. प्रा.शरद पाटील व संदीप वळवी यांचा विजय झाला आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचं स्वप्न भंग करणार्‍या जिल्हा परिषदेचे सदस्य पोपटराव सोनवणे यांच्या मुलाचा अक्षय पोपटराव सोनवणे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. तसेच खा. डॉ. सुभाष भामरे यांचे बंधू सुरेश रामराव भामरे यांनाही पराभव पत्करावा लागला आहे.

  विजयाेत्सव साजरा
  दरम्यान महिला मतदार संघातून भाजपाचे अनिकेत विजय पाटील यांच्या मातोश्री शिलाताई विजय पाटील या सर्वांधिक ७५८ मतांनी निवडून आल्या आहेत. विजयाबद्दल त्यांचे पती माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील यांनी पेढे भरवून आनंद साजरा केला. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यांच्या पत्नी सिमाताई तुषार रंधे या देखील ७४५ मते मिळवून निवडून आल्या आहेत.

  अशी मिळाली मते
  कृषी पणन संघाच्या जागेतून माजी आ. राजवर्धन कदमबांडे हे १३१ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी अंकुश विक्रम पाटील यांचा पराभव केला असून त्यांना केवळ 8 मतांवर समाधान मानावे लागले. विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विेशेष मागासवर्गीय सदस्यांमधून महंत दर्यावगीर दौलतगिर हे ६९४ मते मिळवून विजयी झाले. तर त्यांच्याविरोधातील सुरेश फकीरा शित्रे यांचा २४३ मते मिळून परावभ झाला. तर माजी आ. प्रा. शरद पाटील यांनी १२० मते मिळवून सुरेश रामराव पाटील यांचा पराभव केला. सुरेश पाटील यांना केवळ ७७ मते मिळाली. तर महिला मतदार संघातून शिलाताई विजय पाटील या सर्वांधिक ७५८ मतांनी निवडून आल्या. तर सिमाताई तुषार रंधे या देखील ७४५ मते मिळवून विजयी झाल्या आहेत. तर हिरकणबाई बाबुराव पाटील यांना २०० मते मिळाली असून त्याचा पराभव झाला आहे. तर किसान संघर्ष पॅनलचे नंदुरबार तालुक्यातून माजी आ. चंद्रकांत रघुवंशी हे ५९ मते मिळवून विजयी झाले असून त्यांनी पावबा माधवराव धनगर यांचा पराभव केला आहे. धनगर यांना केवळ ८ मतांवर समाधान मानावे लागले आहे. तसेच अक्राणी महलमधून संदीप मोहन वळवी यांना दहा मते मिळवून विलास पुनाजी पाडवी यांचा पराभव केला आहे. पाडवी यांना केवळ ६ मते मिळाली आहे.

  साक्रीतून यांचा विजय
  साक्री तालुक्यातून हर्षवर्धन शिवाजीराव दहिते यांनी ५२ मते मिळवित विजय मिळविला. त्यांनी अक्षय पोपटराव सोनवणे यांचा पराभव केला. सोनवणे यांना २५ मते मिळाली. नवापूर तालुक्यातून अमरसिंग हुरजी गावीत यांनी १३ मते मिळवित अभिमन फुलसिंग वसावे याचा पराभव केला. वसावे यांना अवघी ४ मते मिळाली. तसेच शिंदखेडा तालुक्यातून राजेंद्र शामराव देसले हे ६२ मते मिळवित विजय झाले. त्यांनी सध्याबाई जयवंतराव बोरसे यांचा पराभव केला. बोरसे यांना ४४ मते मिळाली आहेत.

  ७ जागा बिनविरोध
  धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यात यापूर्वीच निवडणुकीत ७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. बिनविरोध उमेदवारांमध्ये भगवान विनायक पाटील (धुळे तालुका), प्रभाकराव चव्हाण (शिरपूर तालुका), दीपक पुरूषोत्तम पाटील (शहादा तालुका), आमशा फुलजी पाडवी (अक्कलकुवा तालुका), भरत बबनराव माळी (तळोदा तालुका) व शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक व शामकांत सनेर यांचा समावेश आहे.

  मतमोजणीसाठी यांनी घेतले परिश्रम
  मतमोजणीसाठी जिल्हा उपनिबंधक अभिजीत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबारचे तालुका निबंधक नीरज चौधरी, राजेंद्र विरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश शिंपी, शेखर साळी, अमोल इंडाईत, संजय इंडाईत, आनंद शिंदे,योगेश पाटील, सुनील मोगरे, नितीश महाले आदींनी परिश्रम घेतले.

  महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार
  चंद्रकांत रघुवंशी (निवड), शांमकांत सनेर (बिनविरोध), शरद पाटीलसर (निवड), शिरीष नाईक (बिनविरोध), भगवान पाटील (बिनविरोध), आमशा पाडवी (बिनविरोध), अमरसिंग गावीत (निवड), संदीप वळवी (निवड), शीलाताई नवल पाटील (निवड)

  भाजपप्रणित
  प्रभाकर चव्हाण (बिनविरोध), भरत माळी (बिनविरोध), दीपक पाटील (बिनविरोध), राजवर्धन कदमबांडे (निवड), सिमा तुषार रंधे (निवड), राजेंद्र देसले (निवड), हर्षवर्धन दहिते (निवड), मंहत दर्यावगीर (निवड)