कमांड, शस्त्र प्रशिक्षणासह फिटिंगचा थरार अनुभव ; एनसीसीच्या पाच दिवसीय शिबिरास प्रारंभ

छात्रसैनिकांचे बी आणि सी प्रमाणपत्र परीक्षेची पूर्व तयारी करण्यात येत आहे. कर्नल बी. व्ही. एस. शिवाराव म्हणाले की, नॅशनल कॅडेट कॉर्प्स (छउउ) हा भारतीय लष्कराचा एक महत्त्वाचा दुवा आहे. एनसीसी देशासाठी समर्पित तरुणांची आघाडीची फळी बनवते. त्यांनी एनसीसी कॅडेट्सना शिबिराचे उपक्रम पूर्ण समर्पण आणि भक्तीने शिकण्याचे आणि आत्मसात करण्याचे आवाहन केले.

  धुळे : ४८ महाराष्ट्र बटालीयन एनसीसीच्या वतीने पाचदिवसीय अनिवासी वार्षिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शहरातील चार महाविद्यालयामध्ये करण्यात आले. या शिबिरात ड्रिल कमांड, शस्त्र प्रशिक्षणास रायफल खोलणे अन‌् फिटिंगचा थरार अनुभव छात्रसैनिक घेत आहेत. तसेच या शिबिरांमध्ये सहभागी छात्रसैनिकांनी विविधांगी प्रशिक्षण दिण्यात येणार आहे.

  यांचा सहभाग
  शिबिराचे उद्घाटन कमाडिंग ऑफिसर कर्नल बी. व्ही.. एस. शिवाराव यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या नियमांचे पालन करत या शिबिरात एसएसव्हीपीएस कला व वाणिज्य महाविद्यालय, डॉ. पा. डा. घोगरे विज्ञान महाविद्यालय, विद्यावर्धिनी महाविद्यालय, झेड. बी. पाटील महाविद्यालय, येथील सिनियर डिव्हिजन आणि सिनीयर विंगचे १३५ छात्रसैनिक सहभागी झाले आहेत.

  या विषयांवर व्याख्यान
  शिबिरात छात्रसैनिकांना ड्रिल व कमांड, शस्त्र प्रशिक्षण, ७.६२ एमएम एसएलआर खोलणे आणि फिटिंग करणे, चालवण्याचे प्रशिक्षण वडेल रोड फायर रेंज येथे देण्यात येत आहे. या शिवाय छात्रसैनिकांना नकाशा वाचन, सैन्य व शस्त्र, सांकेतिक चिन्ह ओळख, ग्रीड प्रणाली, रोमर, प्रिज्मेटिक कंपास यांचा अभ्यास, युद्ध क्षेत्र व युद्ध कौशल्य, फिल्ड इंजिनियरिंग, बाधा प्रशिक्षण, साहसिक क्रियाकला आदीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता, अखंडता, नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकास, नागरी सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन, स्वास्थ्य आणि स्वच्छतेचे महत्त्व, योगासने होम नर्सिंग, आत्मरक्षा, सामाजिक औपचारीक ज्ञान व सांस्कृतिक आदान प्रदान या विषयावर तज्ज्ञांचे व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

  शिस्तीचा आदर्श
  छात्रसैनिकांचे बी आणि सी प्रमाणपत्र परीक्षेची पूर्व तयारी करण्यात येत आहे. कर्नल बी. व्ही. एस. शिवाराव म्हणाले की, नॅशनल कॅडेट कॉर्प्स (छउउ) हा भारतीय लष्कराचा एक महत्त्वाचा दुवा आहे. एनसीसी देशासाठी समर्पित तरुणांची आघाडीची फळी बनवते. त्यांनी एनसीसी कॅडेट्सना शिबिराचे उपक्रम पूर्ण समर्पण आणि भक्तीने शिकण्याचे आणि आत्मसात करण्याचे आवाहन केले. छात्रसैनिकांनी कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य करावे छात्रसैनिकांनी देश व समाप्रती आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य करणे आवश्यक आहे. कोविड-१९च्या संवेदनशील काळात आपल्या छात्रसैनिकांनी शिबिराच्या माध्यमातून शिस्तीचे एक आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवावे,

  यांचे परिश्रम
  परीक्षेची पूर्व तयारी करण्यात येत आहे. शिबिरासाठी ४८, महाराष्ट्र बटालीयनचे समादेशक अधिकारी कर्नल बी. व्ही. एस. शिवाराव, कर्नल पराग कुलकर्णी, सुभेदार मेजर गुरमित सिंग, प्राचार्य मनोहर पाटील, प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन डॉ. के. जी. बोरसे, कॅप्टन के.एम. बोरसे, डॉ. मोहनकुमार बाढे, लेप्ट पंकज देवरे, लेप्ट शशिकांत खलाणे, लेप्ट क्रांती पाटील, थर्ड ऑफिसर एस बी. बाविस्कर, गजपती गावडे, संदीप अहेर आदी परिश्रम घेत आहेत.