घर मालकाने मागितले घरभाडे, भाडेकरूनी असं काही केलं की पोलिसही हादरले…

रमेश हिलाल श्रीराव ( वय ६०, प्लॉट नं.४, आशिर्वाद बंगला राजहंस कॉलनी, धुळे) असे मयत घर मालकाचे नाव आहे. ते स्टेट बँकेच्या कुसुंबा शाखेतून एप्रिलमध्ये निवृत्त झाले होते. त्यांच्या घरात गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून जुन्नर येथील मुकबधीर शाळेत शिक्षक असलेले विश्वनाथ मेमाणे हे कुटूंबासह राहत होते. त्यांना दोन मुले असून अजिक्य मेमाणे (वय २२) हा कोपरगाव येथे बीसीएचे शिक्षण घेत होता.

    धुळे : शहरातील चितोड रोडवरील राजहंस कॉलनीत घर भाड्याचा तगादा लावण्याच्या कारणावरून भाडेकरू तरूणाने घरमालकाचा लोखंडी पावडीने वार करत निर्घृण खून केला. आज सकाळी ही खळबळजनक घटना घडली. दरम्यान घर मालकाचा खून केल्यानंतर भाडेकरू तरूणाने घर मालकाच्या पत्नीलाही जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तीने आरडा-ओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी केली होती.

    रमेश हिलाल श्रीराव ( वय ६०, प्लॉट नं.४, आशिर्वाद बंगला राजहंस कॉलनी, धुळे) असे मयत घर मालकाचे नाव आहे. ते स्टेट बँकेच्या कुसुंबा शाखेतून एप्रिलमध्ये निवृत्त झाले होते. त्यांच्या घरात गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून जुन्नर येथील मुकबधीर शाळेत शिक्षक असलेले विश्वनाथ मेमाणे हे कुटूंबासह राहत होते. त्यांना दोन मुले असून अजिक्य मेमाणे (वय २२) हा कोपरगाव येथे बीसीएचे शिक्षण घेत होता.

    लॉकडाऊनमुळे तो काही महिन्यांपासून आई-वडीलांकडे राहत होता. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास रमेश श्रीराव हे टेरेसवर योगा करीत असताना अजिंक्यने त्यांच्यावर मागून लोखंडी पावडीने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्याने श्रीराव यांची पत्नीचा गळा होण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कडून सुटका करत गॅलरी धाव घेत आरडाओरड सुरु केली. त्यामुळे आजू-बाजूचे लोक धावून आले. त्यांनी अजिंक्यला पकडले.

    घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सपोनि तिगोटे, दादासाहेब पाटील तसेच एएसआय नाना आखाडे, नितीन अहिरे, पोकॉं भिकाजी पाटील, पोना संदीप पाटील, प्रल्हाद वाघ, सतीश कोठावदे, मनीष सोनगीरे, कमलेश सुर्यवंशी, प्रवीण पाटील, तुषार मोरे, सचिन पगारे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. थकीत घरभाड्याचा तगादा लावल्याने अजिंक्य मेमाने याने रमेश श्रीराव यांचा खून केल्याची घटनास्थळी चर्चा होती.

    अशीही चर्चा- रमेश श्रीराव हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडे निवृत्तीचा पैसा आलेला होता. या पैशाचा विनियोग कशाप्रकारे करायचा याची चर्चा देखील श्रीराव यांची अजिक्यशी होत होती. त्याला पैशांची गरज असल्याने त्याने चोरी, दरोड्याचा बनाव रचला. पैशांवर डोळा ठेवत त्याने श्रीराव यांचा खून केला. त्याच्या पत्नीवरही हल्ला केला. मात्र ती बचावल्याने त्याच्या प्लॅनचा भांडाफोड झाल्याचही परिसरात चर्चा होती.