नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ‘एंट्री’ होताच घडला धक्कादायक प्रकार; ‘लगेचच पोलिसांनी…’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. पण त्यांच्या या दौऱ्यादरम्यान (Nashik Tour) लोकांची मोठी झुंबड उडाली. मुख्यमंत्र्यांच्या शेजारी अचानक कार्यकर्ते आणि लोक एकत्र आले.

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. पण त्यांच्या या दौऱ्यादरम्यान (Nashik Tour) लोकांची मोठी झुंबड उडाली. मुख्यमंत्र्यांच्या शेजारी अचानक कार्यकर्ते आणि लोक एकत्र आले. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. या घटनेची एकच चर्चा सुरु आहे.

मुख्यमंत्री शिंदे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते एका कार्यक्रमाला आले असता अचानक त्यांच्याभोवती लोकांनी गराडा घातला होता. गेटमधून येत असताना त्यांच्याभोवती लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. अचानक इतक्या मोठ्या स्वरूपात गर्दी झाल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

शेतकऱ्यांच्या लाँग मार्चची सरकारकडून दखल

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईच्या दिशेने मोर्चा निघाला होता. पण या मोर्चाची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोर्चेकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले.

70 टक्के मागण्या मान्य

शेतकऱ्यांचा किसान लाँग (Farmers Long March) मार्च अखेर स्थगित करण्यात आला आहे. शेतकरी नेते जे. पी. गावित (J. P. Gavit) यांनी याबाबत माहिती दिली आहे. सरकारनं शिष्टमंडळ घेऊन बोलावलं आणि आमच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारकडून आमच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. बाकीच्या मागण्यांवर विचार सुरु आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.