जळगावात मध्यरात्री दोन मजली इमारत कोसळली, 11 जण जखमी

पहाटे ४ वाजेच्या सुमारास इमारतीची माती पडायला सुरुवात झाल्याने रोहित पाटील याला जाग आली. प्रसंगावधान राखत त्याने लागलीच कुटुंबीय रमेश पाटील, शोभा पाटील यांच्यासह दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या बहिणी सोनाली पाटील, गायत्री पाटील व एक ५ वर्षीय चिमुकली यांना बाहेर काढले. सर्व जिन्यावर येताच इमारत कोसळली. कोसळलेल्या इमारतीच्या खालील खोलीत कलाबाई पाटील (वय-७५ ) या वृद्धा राहत होत्या. वरील मजल्यावरील सर्वांना बाहेर काढल्यानंतर आजीला बाहेर काढण्याच्या आतच इमारत कोसळली. हाडांना आणि छातीला मार लागल्याने आजी हालचाल करू शकत नव्हत्या.

    जळगाव शहरातील शनीपेठ परिसरात असलेल्या महानगर पालिकेच्या गंगुबाई शाळेसमोर असलेली एक जुनी इमारत गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने वेळीच बाहेर पडल्याने 11 लोक बचावले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या एका वृद्धेला परिसरातील तरुणांनी सुखरूप बाहेर काढले आहे.

    इमारत कोसळली तेव्हा मोठा आवाज झाला. यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तसंच गोंधळ उडाला होता. इमारत कोसळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी शशिकांत बारी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी मदतकार्याला सुरुवात केली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

    पहाटे ४ वाजेच्या सुमारास इमारतीची माती पडायला सुरुवात झाल्याने रोहित पाटील याला जाग आली. प्रसंगावधान राखत त्याने लागलीच कुटुंबीय रमेश पाटील, शोभा पाटील यांच्यासह दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या बहिणी सोनाली पाटील, गायत्री पाटील व एक ५ वर्षीय चिमुकली यांना बाहेर काढले. सर्व जिन्यावर येताच इमारत कोसळली. कोसळलेल्या इमारतीच्या खालील खोलीत कलाबाई पाटील (वय-७५ ) या वृद्धा राहत होत्या. वरील मजल्यावरील सर्वांना बाहेर काढल्यानंतर आजीला बाहेर काढण्याच्या आतच इमारत कोसळली. हाडांना आणि छातीला मार लागल्याने आजी हालचाल करू शकत नव्हत्या.

    दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवित हानी टळली आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आले आहे.