girish mahajan

गिरीश महाजन यांनी पत्नी साधना महाजन (Sadhana Mahajan) यांच्या नावावर दोन दिवसांपूर्वी २५ कोटी रुपयांची मालमत्ता कवडी मोल किमतीत खरेदी केल्याचा नवा आरोप त्यांच्यावर झाला आहे. माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. या नव्या आरोपामुळे महाजन यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे.

जळगाव : भाजपचे जामनेरचे आमदार आणि माजी मंत्री गिरीश महाजन (BJP MLA Girish Mahajan) पून्हा एकदा गोत्यात येण्याची शक्यता आहे. जळगाव शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील (बीएचआर) घोटाळा (BHR Scam, Jalgaon)सध्या चांगलाच गाजत असताना   गिरीश महाजन यांच्यावर आणखी एक खळबळजनक आरोप झाला आहे.

गिरीश महाजन यांनी पत्नी साधना महाजन (Sadhana Mahajan) यांच्या नावावर दोन दिवसांपूर्वी २५ कोटी रुपयांची मालमत्ता कवडी मोल किमतीत खरेदी केल्याचा नवा आरोप त्यांच्यावर झाला आहे. माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. या नव्या आरोपामुळे महाजन यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे.

गिरीश महाजन यांनी पत्नी साधना महाजन यांच्या नावे दोन दिवसांपूर्वी सुमारे 25 कोटींची मालमत्ता अवघ्या दीड कोटी रुपयांत खरेदी केली. लालवाणी यांनी थेट पत्रकारपरिषद घेत हे आरोप केले आहेत.   जामनेर नगरपालिकेत झालेल्या अनेक गैरव्यवहारांमागे देखील गिरीश महाजन यांचाच हात असल्याचा गंभीर आरोपही लालावाणी यांनी यावेळी केले. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, बीएचआर घोटाळ्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा महाजन यांनी केला आहे. आते या नविन आरोपांबद्दल काय खुलासा करतात याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.