भुसावळ मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा

आरपीएफ कर्मचाऱ्यांनी झेंडाला वंदन करून सलामी आणि मंडळ रेल्वे प्रबंधक यांच्या निरीक्षण खाली आरपीएफ कर्मचाऱ्यांनी परेडला सुरुवात करण्यात आली. मंडळ रेल्वे प्रबंधक श्री विवेक कुमार गुप्ता यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना ७४ वा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

भुसावळ : स्वातंत्र्य दिनानिमित्त आज दिनांक १५.०८.२०२० सकाळी ०९.३७ वाजता मंडळ रेल्वे प्रबंधक श्री विवेक कुमार गुप्ता यांच्या शुभ हस्ते मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयाच्या प्रांगणात झेंडा वंदन करण्यात आले . 

यावेळी आरपीएफ कर्मचाऱ्यांनी झेंडाला वंदन करून सलामी आणि मंडळ रेल्वे प्रबंधक यांच्या निरीक्षण खाली आरपीएफ कर्मचाऱ्यांनी परेडला सुरुवात करण्यात आली. मंडळ रेल्वे प्रबंधक श्री विवेक कुमार गुप्ता यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना ७४ वा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आणि महाप्रबंधक यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. मंडळ रेल्वे प्रबंधक यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सम्मान करण्यात आला आहे.

याप्रसंगी अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक श्री मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी श्री एन डी गांगुर्डे, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक श्री आर के शर्मा, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक श्री युवराज पाटील, वरिष्ठ मंडळ विधुत अभियंता श्री जी के लखेरा, वरिष्ठ मंडळ दूरसंचार सिंग्नल अभियंता श्री निशांत द्विवेदी, वरिष्ठ मंडळ अभियंता ( समन्वय ) श्री राजेश चिखले , वरिष्ठ मंडळ सुरक्षा अधिकारी श्री एन के अग्रवाल, वरिष्ठ मंडळ विधुत अभियंता ( टीआरओ ), श्री पी के भंज, वरिष्ठ मंडळ विधुत अभियंता ( टीआरडी ) श्री प्रदीप ओक, मंडळ सुरक्षा आयुक्त श्री क्षितिज गुरव आणि सर्व शाखांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या वेळी सोशल डीस्टनसिंग ठेवून व मास्क लावून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.