
राज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यातील संर्घष आता टीपेला पोहोचला आहे. जळगावमध्ये दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वावरून जोरदार चढाओड रंगली आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेने भाजपाला धक्का देत महापालिकेच्या सत्तेतून बाहेर केले. त्यावेळी भाजपच्या 30 नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता काही महिने उलटल्यावर भाजपानेही शिवसेनेवर पलटवार केला आहे. या 30 बंडखोर नगरसेवकांपैकी काही नगरसेवकांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करत घरवापसी केली आहे.
जळगाव : राज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यातील संर्घष आता टीपेला पोहोचला आहे. जळगावमध्ये दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वावरून जोरदार चढाओड रंगली आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेने भाजपाला धक्का देत महापालिकेच्या सत्तेतून बाहेर केले. त्यावेळी भाजपच्या 30 नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता काही महिने उलटल्यावर भाजपानेही शिवसेनेवर पलटवार केला आहे. या 30 बंडखोर नगरसेवकांपैकी काही नगरसेवकांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करत घरवापसी केली आहे.
गिरीश महाजन ॲक्शन मोडमध्ये
भाजपा नेते गिरीश महाजन जळगावात पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. महापालिकेत भाजपचे 57 नगरसेवक निवडून आल्याने गेल्या अडीच वर्षापूर्वी मनपात भाजपाची सत्ता होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी पहिल्या टप्प्यात भाजपातील 27 नगरसेवकांनी बंडखोरी करीत मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत हातावर शिवबंधन बांधले. त्यामुळे मनपात सत्ता परिवर्तन होवून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. त्यानंतर महापौर, उपमहापौर निवडणुकीनंतर पुन्हा तीन नगरसेवकांनी बंडखोरी करीत मुंबईला वर्षाबंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता.
स्थायी समिती सभापतीच्या निवडीत चुरस
आगामी काळात महापालिकेत स्थायी समिती सभापतीची निवड होणार आहे. या निवडीत भाजपचा गटनेता कोण याची चुरस वाढली आहे. यात भाजपकडून भगत बालाणी तर बंडखोरांकडून अॅड. पोकळे हे उमेदवार असतील. या पूर्वीच भाजपचे गटनेते कोण हे सिद्ध करावे लागणार असल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोर नगरसेवक सुरेश सोनवणे, शोभा बारी व हसीना बी शेख या तिघांची घरपावसी केली. त्यामुळे भाजपाचे गटनेते भगत बालाणीच राहणार असल्याचे सिद्ध झाले आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थायी समितीच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेला पाठींबा देणारे भाजपचे 3 बंडखोर नगरसेवक स्वगृही परतल्याने हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.