Copy in Maharashtra Police Recruitment Exam

जळगाव पोलीस शिपाई भरती परीक्षेचा लेखी पेपर सुरु असताना कॉपीचा अजब प्रकार पहायला मिळाला(Copy in Maharashtra Police Recruitment Exam). उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा केंद्रात व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पेपर सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या परीक्षार्थी तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी कॉपी करणाऱ्या तरुणासह त्याला मदत करणाऱ्यांविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरा गुन्हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

    जळगाव : जळगाव पोलीस शिपाई भरती परीक्षेचा लेखी पेपर सुरु असताना कॉपीचा अजब प्रकार पहायला मिळाला(Copy in Maharashtra Police Recruitment Exam). उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा केंद्रात व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पेपर सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या परीक्षार्थी तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी कॉपी करणाऱ्या तरुणासह त्याला मदत करणाऱ्यांविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरा गुन्हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

    पोलिस शिपाई भरती २०१९ची प्रक्रीया सुरू झाली आहे. यात जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर १२८ पदांसाठी आज ९ ऑ‘क्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता जळगाव व भुसावळ शहरातील ६८ केंद्रांवर २१ हजार ६९० उमेदवारांची १०० गुणांची बहुपर्यायी लेखी परिक्षा घेण्यात आली. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही परीक्षा केंद्र होते.

    याठिकाणी योगेश रामदास आव्हाड (रा.पांझनदेव, पोस्ट.नागापूर जि.नांदगाव) या परीक्षार्थी तरुणाने परीक्षा केंद्रात नजर चुकवून मोबाईल आणला होता. योगेशने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका आपल्या एका मित्राला पाठवली. त्यानंतर त्याच्या मित्राने प्रश्नांची उत्तर सोडवून त्याला पाठवायला सुरुवात केली. हा प्रकार सपोनि देवरे यांच्या लक्षात आल्यानंतर योगेशला तात्काळ परीक्षा केंद्राच्या बाहेर नेत चौकशी करण्यात आली.

    याप्रकरणी योगेश रामदास आव्हाड आणि त्याचा मित्र (नाव निषपन्न नाही) अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान,जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कुल,जळगांव येथील परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थी उमेदवार प्रतापसिंग गुलचंद बालोद बैठक क्रमांक ७२१७०५९ हा परीक्षेत गैरप्रकार  करत असतांना निदर्शनास आला. या परीक्षार्थीवर देखील गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु आहे.