…तर तुम्हाला डोक्यावर घेवून नाचू; गिरीश महाजनांचे एकनाथ खडसेंना ओपन चॅलेंज

भाजप नेते गिरीश महाजन(Girish Mahajan) आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांच्यातील वाजद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. खडसेंची मानसिकता खराब होत चालली असून त्यांना मानसोपचार तज्ञाकडे दाखवावं लागणार असल्याची घणाघाती टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

    जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन(Girish Mahajan) आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांच्यातील वाजद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. खडसेंची मानसिकता खराब होत चालली असून त्यांना मानसोपचार तज्ञाकडे दाखवावं लागणार असल्याची घणाघाती टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

    एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात गिरीश महाजन यांचे नाव न घेता टीका केली होती. एका शिक्षकाच्या मुलाकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कशी आली? असा सवाल उपस्थित करत त्यांनी खडसेंनी महाजनांवर निशाणा साधला होता.

    खडसेंच्या टीकेला महाजनांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझ्याकडे कितीही मालमत्ता आहे याची चौकशी करा. तुमचे सरकार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुमचे वजन आहे, मग तुमच्या नेत्यांना सांगून माझी चौकशी करा, अशा शब्दांत महाजन यांनी खडसेंना खुले आव्हान दिले.

    दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा स्वतःकडे बघा, तुम्ही स्वतः जिल्ह्यातील जनतेला सांगत होता की, मी दुचाकीत रॉकेल टाकून फिरायचो. मग एवढी संपत्ती आली कुठून? तुमच्या नावाचे एवढे उतारे कसे झाले? याचीही माहिती जनतेला द्या. ईडी आता तुमची चौकशी करत आहे. मग, त्या चौकशीला सामोरे जा, इडीला आवश्यक ती कागदपत्रे सादर करून दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना. कशाला इकडे तिकडे पळत फिरताय, म्हणत चिमटा काढला .