jalgaon corporator joining shivsena

जळगाव(Jalgaon) जिल्ह्यातील एकनाथ खडसे (Eknath Khadse) समर्थक असलेल्या भाजपच्या ११ नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश(BJp Corporators Join Shivsena) केला आहे.

    जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon) भाजपला पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. मुक्ताईनगर (Muktainagar) आणि बोधवड(Bodhwad) नगरपालिकेतील (11 BJP Corporators Join Shivsena ) ११ नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

    जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे (Eknath Khadse) समर्थक असलेल्या भाजपच्या ११ नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. सेनेचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील सुद्धा यावेळी उपस्थितीत होते. उद्धव ठाकरे यांनी सर्व नगरसेवकांच्या हातावर शिवबंधन बांधून प्रवेश दिला आहे. मुक्ताई नगर आणि बोधवड नगरपालिकाचे भाजप नगरसेवक हातावर शिवबंधन बांधले आहे.

    काही महिन्यांपूर्वीच जळगावमध्ये शिवसेनेनं भाजपला मोठा दणका दिला होता. जळगाव महापालिका महापौर निवडणुकीत भाजपचे २७ नगरसेवक सेनेत खेचून आणले होते. त्यामुळे जळगाव महापालिकेत सेनेचा भगवा फडकला होता.