५० हजार रुपयांसाठी केला सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ, पीडितेने केली पोलीसांत तक्रार

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्यानगर माहेर असलेल्या ज्योतीबाई गाडेकर (वय ३०) यांचा विवाह संतोष गाडेकर (रा. सोयगाव ता. औरंगाबाद) यांच्याशी २००९ मध्ये झाला. सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती संतोष यांनी ज्योतीबाईंना क्षुल्लक कारणावरून टोमणे मारणे सुरू केले व माहेरहून ५० हजार रूपये आणण्यासाठी त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. यात सासरे, दिराणी आणि जेठाणीही सहभागी होते. अखेर हा जाच सहन न झाल्याने ज्योतीबाई माहेरी निघून आल्या व त्यांनी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुरूवारी २ डिसेंबर रोजी पोलिसात तक्रार दिली.

    जळगाव : जळगावचे माहेर असलेल्या विवाहितेचा पैशांसाठी पतीसह सासरच्या मंडळींनी छळ केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, पीडित विवाहितेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्यानगर माहेर असलेल्या ज्योतीबाई गाडेकर (वय ३०) यांचा विवाह संतोष गाडेकर (रा. सोयगाव ता. औरंगाबाद) यांच्याशी २००९ मध्ये झाला. सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती संतोष यांनी ज्योतीबाईंना क्षुल्लक कारणावरून टोमणे मारणे सुरू केले व माहेरहून ५० हजार रूपये आणण्यासाठी त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. यात सासरे, दिराणी आणि जेठाणीही सहभागी होते. अखेर हा जाच सहन न झाल्याने ज्योतीबाई माहेरी निघून आल्या व त्यांनी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुरूवारी २ डिसेंबर रोजी पोलिसात तक्रार दिली.

    याप्रकरणी ज्योतीबाई यांच्या तक्रारीवरून, पती संतोष गाडेकर, सासरे दत्तू गाडेकर, जेठाणी सीमा गाडेकर आणि दिराणी ललिता गाडेकर (सर्व रा. सोयगाव ता. औरंगाबाद) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील करीत आहेत.